‘प्रज्ञाशोध’साठी १५ विद्यार्थ्यांंची निवड

By admin | Published: March 6, 2017 02:10 AM2017-03-06T02:10:03+5:302017-03-06T02:10:03+5:30

अकोल्यातील विद्यार्थी सर्वाधिक, राज्यात ३६६ विद्यार्थ्यांंची निवड.

The choice of 15 students for 'PradnyaShod' | ‘प्रज्ञाशोध’साठी १५ विद्यार्थ्यांंची निवड

‘प्रज्ञाशोध’साठी १५ विद्यार्थ्यांंची निवड

Next

अकोला, दि. ५- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी अकोला जिल्हय़ातील १५ विद्यार्थ्यांंंची निवड करण्यात आली. पश्‍चिम विदर्भातून अकोल्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांंची निवड झाली. ही भूषणावह बाब आहे. यातील तीन विद्यार्थी एकट्या शिवाजी माध्यमिक शाळेचे आहेत.
राज्य स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेला इयत्ता दहावीतून राज्यभरातून ७९ हजार ४८७ विद्यार्थी बसले होते. अकोला जिल्हय़ातूनसुद्धा चार हजारांवर विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेत राज्यभरातून केवळ ३६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांंंची राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या एक हजार विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांंंमध्ये सर्वसाधारण गटातून २८४ विद्यार्थी, अनुसूचित जाती गटातून ५५ विद्यार्थी आणि अनुसूचित जमाती गटातुन २७ विद्यार्थ्यांंंचा समावेश आहे. अकोला जिल्हय़ातून १५ विद्यार्थ्यांंंची निवड झाली आहे. पश्‍चिम विदर्भात ही संख्या सर्वाधिक आहे. अमरावती जिल्हय़ातून सहा विद्यार्थी, बुलडाणा जिल्हय़ातून सात, वाशिम जिल्हय़ातून चार, यवतमाळ जिल्हय़ातून तीन विद्यार्थ्यांंंची निवड झाली. राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञाशोध परीक्षा १४ मे २0१७ रोजी होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंंची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.
पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांंंना त्यांच्या घरच्या पत्त्यावर एनसीईआरटी दिल्लीमार्फत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे प्रवेशपत्र मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात पाठविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात अकोल्याचे विद्यार्थी पाचव्या क्रमांकावर
*राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झालेल्या अकोल्यातील विद्यार्थ्यांंंनी महाराष्ट्रात पाचवे स्थान पटकावले आहे. विदर्भात अकोला जिल्हय़ाने अव्वल स्थान पटकावले आहे.
*औरंगाबादच्या ५८ विद्यार्थ्यांंंची प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली असून, ठाणे जिल्हय़ातील ३५, मुंबईतील ३२, पुणे २१, बीड जिल्हय़ातून २0, अकोला जिल्हय़ातून १५ आणि जळगाव जिल्हय़ातून १४ विद्यार्थ्यांंंंची निवड झाली.

Web Title: The choice of 15 students for 'PradnyaShod'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.