‘रई’ वऱ्हाडी समीक्षा ग्रंथामध्ये जिज्ञासू अभिव्यक्तीचे मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:51+5:302021-07-19T04:13:51+5:30
अकोला : अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंचतर्फे प्रसिद्ध साहित्यिक ‘कास्तकारायनकार’ प्रा. सुनील पखाले, वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन वऱ्हाडी साहित्य ...
अकोला : अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंचतर्फे प्रसिद्ध साहित्यिक ‘कास्तकारायनकार’ प्रा. सुनील पखाले, वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन वऱ्हाडी साहित्य जागर चर्चासत्र आयोजित केले होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. पखाले यांनी ‘रई’ अभ्यासल्यास वऱ्हाडी साहित्य अभ्यासकाचे कार्य सुलभ होऊ शकते तसेच ‘रई’ ह्या ग्रंथाची दखल वऱ्हाडी साहित्य अभ्यासताना घ्यावीच लागेल, असे प्रतिपादन केले. ‘रई’ वऱ्हाडी समीक्षा ग्रंथ १०१ वऱ्हाडी बोलीभाषेतील कवितांवर असून संपूर्ण समीक्षण प्रा. देवबाबू लुले यांनी वऱ्हाडी बोलीभाषेतूनच केले आहे. या ग्रंथात वऱ्हाडी साहित्य विश्वातील प्रस्थापित आणि नवोदित कवींच्या कवितांचे समीक्षण केले आहे.
चर्चासत्रात जेष्ठ साहित्यिक आबासाहेब कडू, विजयजी बिंदोड, साधना काळबांडे, ‘रई’चे लेखक प्रा. महादेव लुले यांनी विचारमंथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे अध्यक्ष श्याम ठक यांनी केले. चर्चासत्राला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, सल्लागार प्रा. सदाशिव शेळके, रवींद्र दळवी, अरुण विघ्ने, रतन बघे, विनायक भारंबे, नीलेश देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदन प्रकाश गायकी अकोट यांनी केले. आभार नीलेश कवडे यांनी मानले.