शिर्ला जिल्हा परिषद गटात चुरशीची निवडणूक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:48+5:302021-07-02T04:13:48+5:30
१९ जुलै रोजी होणाऱ्या मतदानाच्या दृष्टिकोनातून उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी मतदान केंद्राची पाहणी केली. प्रामुख्याने आगी खेड मतदान केंद्राची छताची दुरुस्त ...
१९ जुलै रोजी होणाऱ्या मतदानाच्या दृष्टिकोनातून उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी मतदान केंद्राची पाहणी केली. प्रामुख्याने आगी खेड मतदान केंद्राची छताची दुरुस्त करण्याचे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव शेलार, तहसीलदार दीपक बाजड नायब तहसीलदार विजय खेडकर तथा तलाठी यांनी भंडाराज बु. शिर्ला, नांदखेड, खामखेड, आगीखेड, खानापूर, पार्डी, कोठारी,आष्टुल, पाष्टुल मतदान केंद्राची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शिर्ला जिल्हा परिषद गटासाठी १८,४६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी ९,७१८ पुरुष आणि ८,७४५ स्त्रिया मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये दिग्रस बु. गणातून ७२७९ एकूण मतदारांपैकी ३८०९ पुरुष आणि ३४७० महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिर्ला जिल्हा परिषद गणात १११८४ एकूण मतदार असून, ५९०९, पुरुष ५२७५ महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
असे आहेत मतदान केंद्र
दिग्रस बुद्रूक गणांमध्ये दिग्रस बु. येथे दोन, बेलुरा बु.,बेलुरा खु., हिंगणा-वाडेगाव, तुलंगा बुद्रूक, दिग्रस खुर्द तांदळी बुद्रूक तांदळी खुर्द या ठिकाणी प्रत्येकी एक मतदान केंद्र आहे. शिर्ला पंचायत समिती गणामध्ये भंडाराज बुद्रूक येथे दोन शिर्ला येथे दोन यासह नऊ मतदान केंद्र पातूर शहरात आहे. खानापूर पंचायत समिती गणात एकूण नऊ मतदान केंद्र आहे. यापैकी खानापूर येथे दोन नांदखेड, खामखेड, आगीखेड, पार्डी, कोठारी बु. आष्टुल, पाष्टुल या ठिकाणी प्रत्येकी एक केंद्र आहे. आलेगाव पंचायत समिती गणात एकूण आठ मतदान केंद्र आहे. कार्ला वगळता उर्वरित सर्व मतदान केंद्र आलेगावात आहेत. शिर्ला जिल्हा परिषद गट, शिर्ला, आलेगाव आणि खानापूर पंचायत समिती गणात होत असलेली निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचा चित्र आहे.