‘स्थायी’च्या सभापती पदासाठी चुरस; इच्छुकांची ‘लॉबिंग’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:03 AM2018-03-11T01:03:21+5:302018-03-11T01:03:21+5:30
अकोला : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे येत्या १३ मार्च रोजी सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ १० असल्यामुळे साहजिकच सभापती पदाच्या विजयाची माळ भाजप उमेदवाराच्या गळ््यात पडणार आहे. पक्षातील नगरसेवकांची संख्या, शहराचे भौगोलिक व राजकीयदृष्ट्या समीकरण लक्षात घेऊन दावेदार निवडल्या जाणार असल्याने पक्षात चुरस निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेच्या आर्थिक व इतर विषयाच्या धोरणासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थायी समितीला प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदाला मानाचे स्थान आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये सदस्य पदावर वर्णी लागण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक जीवाचे रान करीत असतात. या समितीमध्ये जाण्यासाठी किमान एकदा तरी संधी मिळावी, म्हणून पक्षाकडे ‘लॉबिंग’ करण्यासह स्वत:चे महत्तव पटवून देण्याचाही अनेकदा प्रयत्न केला जातो.
या समितीने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे नियमानुसार आठ सदस्यांना ईश्वर चिठ्ठीद्वारे निवृत्त व्हावे लागले होते. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. विद्यमान सभापती बाळ टाले यांचा कार्यकाळ ३ मार्च रोजी संपुष्टात आल्यामुळे १३ मार्च रोजी मनपात विशेष सभेमध्ये सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपाने मनपात सत्ता स्थापन केल्यानंतर सभापती पदाची पहिली संधी बाळ टाले यांना दिली. टाले यांनी एक वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, सभापती पदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे चित्र आहे.
नगरसेवकांची एकूण संख्या व राजकीय समीकरणे पाहता स्थायी समितीमध्ये बहुतांश नगरसेवकांची निवड करण्याकडे पक्षाचा कल दिसून येतो. सभापती पदासाठी भाजपात अंतर्गत चुरस निर्माण झाली असून, यामध्ये कोणाची लॉटरी लागते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
‘स्थायी’मध्ये यांचा समावेश!
सत्ताधाºयांच्यावतीने ‘स्थायी’मध्ये नगरसेवक अनिल गरड, विनोद मापारी, नंदा पाटील, शारदा खेडकर, अर्चना मसने यांची निवड करण्यात आली. तर बाळ टाले, सुनील क्षीरसागर, सुजाता अहिर, विशाल इंगळे, पल्लवी मोरे समितीत कायम आहेत. राजकीय समीकरणे लक्षात घेता प्रभाग ८ चे सुनील क्षीरसागर, नंदा पाटील, विशाल इंगळे तसेच अर्चना मसने यांच्यापैकी एकाची सभापती पदासाठी निवड केली जाऊ शकते. वेळप्रसंगी अनिल गरड, शारदा खेडकर यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.