पातूर तालुक्यातील नागरिकांना रेशनची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:39+5:302021-03-19T04:17:39+5:30
मार्च महिन्यात रेशनचे धान्य उचल करण्याकरीता नागरिकांकडे केवळ १५ दिवसांपेक्षा कमी वेळ असल्याने धावपळ होणार आहे. राज्य शासनाने रेशन ...
मार्च महिन्यात रेशनचे धान्य उचल करण्याकरीता नागरिकांकडे केवळ १५ दिवसांपेक्षा कमी वेळ असल्याने धावपळ होणार आहे. राज्य शासनाने रेशन दुकानांचे काम ऑनलाईन सुरु केले आहे. याअगोदर लाभार्थ्यांना पॉझ मशीनवर अंगठा लावल्यानंतरच माल मिळत होता. परंतू आता नवीन प्रणालीनुसार महसूल विभागाच्या गोडावूनमध्ये असलेला माल व रेशन दुकानदाराना वाटप केलेला माल हा ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. आता एखाद्या रेशन दुकानादारास वितरित केलेल्या संपूर्ण मालाचे विवरण पॉझ मशीनवर येणार आहे. या ऑनलाईन प्रणालीमुळे रेशनचा माल स्वस्त धान्य दुकानदाराच्या दुकानात येऊन पडला. ऑनलाईन कामास विलंब होत असल्याने, मार्च महिन्याचे १५ दिवस उलटुनही कार्डधारकांना हक्काचा रेशनचा माल मिळाला नाही. त्यामुळे कार्डधारकांना तातडीने रेशन देण्याची मागणी होत आहे.