मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे पिंजर परिसरातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:18 AM2021-03-19T04:18:06+5:302021-03-19T04:18:06+5:30
मोबाईल नेटवर्क नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पिंजर परिसरातील मोबाईल धारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बीएसएनएलसह खासगी मोबाईल नेटवर्क ...
मोबाईल नेटवर्क नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पिंजर परिसरातील मोबाईल धारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बीएसएनएलसह खासगी मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावात टॉवर उभारले. परंतु मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्याने नागरिकांसह विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
बीएसएनएलच्या भरवशावर सरकारी कार्यालयातील नेटवर्क, बँकिंग व्यवहार, सेमी गव्हरमेंटचे कार्यालय आणि कोट्यवधी मोबाईल धारक अवलंबून आहेत. तसेच हजारो नागरिकांनी इतर कंपन्यांचे मोबाईल सीमकार्ड घेतले आहेत. परंतु मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसते. याकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसह इतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सरकारी कार्यालयातील कामे, बँकिंगची कामे अजिबात होत नाहीत. बँकेत लिंक नसल्यामुळे लोकांना चकरा माराव्या लागतात. वेळेवर कामे होत नाहीत. बँकेतून वेळेवर पैसे मिळत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिक बॅंकेत गेले तर त्यांना लिंक नसल्यामुळे परत जावे लागते. याकडे वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी लोकांची मागणी आहे.