जड वाहतूक बंद करण्यासाठी नागरिकांची पोलीस स्टेशनमध्ये धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:52+5:302020-12-30T04:25:52+5:30
श्री शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाका या अरुंद मार्गावर गत अनेक दिवसांपासून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर ...
श्री शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाका या अरुंद मार्गावर गत अनेक दिवसांपासून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना जड वाहनांमुळे त्रास होत आहे. जड वाहतुकीमुळे अनेक लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर लहान मुले खेळत खेळत रस्त्यावर येतात. जड वाहनामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. २९ डिसेंबर रोजी संभाजी चौकात जड वाहनांमुळे लहान मुलीचा अपघात होता होता टळला. तरी या मार्गावर जड वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली. यावेळी अमोल आकोटकर, रामभाऊ फाटकर, मंगेश ठाकरे, स्वप्निल सुरे, महेश ठाकरे, राहुल झापर्डे, राम खारोडे, सुनील फाटकर, राजेश मामनकार, संतोष मानकर, दीपक टिकार, शंकरराव सुरे, गणेश लासूरकार, किशोर सायानी, विठ्ठल मामनकार, श्याम खारोडे, प्रकाश वासनकर, विशाल सोनटक्के, विठ्ठल बनकर, महेश हागे, गिरीश घोडेश्वर, आकाश फाटकर, शुभम सोनटक्के, तेजस बाभुळकर, शुभम टिकार, प्रकाश ज्ञानेश्वर आवारे, विलास देशमुख, सागर सोनटक्के, शुभम सुरे, विठ्ठल मामनकर, प्रणव मामनकर, शिवम फाटे आदी नागरिक उपस्थित होते.
.............................
तेल्हारा शहरातील आठवडी बाजार ते शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाक्यापर्यंत जड वाहतूक असल्यास त्या वाहनावर कारवाई करण्यात येईल.
दिनेश शेळके, ठाणेदार, पोलीस स्टेशन, तेल्हारा