नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:33+5:302021-03-23T04:19:33+5:30
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रातील ६० वर्षे वयावरील सर्व नागरिक व ४५ वय वर्षांवरील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी ...
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रातील ६० वर्षे वयावरील सर्व नागरिक व ४५ वय वर्षांवरील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश असून, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले . सदर लसीकरण मोहीम राबविण्यासाठी नगर परिषद सभागृहात पर्यवेक्षक शिक्षकांची सभा घेण्यात आली. यावेळी लसीकरण मोहीमबाबत संपूर्ण माहिती वैधकीय अधिकारी डॉ. सोनोने तथा नोडल अधिकारी वाडेकर यांनी सर्व उपस्थित शिक्षकांना दिली. मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रात वरीलप्रमाणे सर्वेक्षण करण्यात येत असून, ११ प्रभागांसाठी ११ पथक तयार करण्यात आली आहेत. सर्व पथक घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची माहिती घेऊन आरोग्य विभागास सादर करतील व त्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. यावेळी प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे यांनी सर्व पथकाना सर्वेक्षणाबद्दल माहिती दिली. मूर्तिजापूर शहरातील या धडक लसीकरण मोहीमसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले आहे.