संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:18 AM2021-04-15T04:18:29+5:302021-04-15T04:18:29+5:30

जिल्हाधिकारी दालनात कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा ...

Citizens should stay at home during communication ban - Bachchu Kadu | संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे - बच्चू कडू

संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे - बच्चू कडू

Next

जिल्हाधिकारी दालनात कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाहीत, याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे निर्देश कडू यांनी दिले. ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन घेण्याबाबतचा प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, रेमडिसिविर इंजेक्शन तसेच बेडची कमतरता पडणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ५० खाटांचे आयसीयू युनिट तयार करण्याबाबत सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.

शिवभोजन व मोफत अन्नधान्याबाबत नियोजन करा

जिल्ह्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. अत्यंत गरीब व ज्यांना जेवणाची व्यवस्था नाही अशा गरजूंसाठी शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. यासाठी गरजूंची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवभोजन थाली व प्राधान्य गटांना देण्यात येणारे मोफत अन्नधान्य याबाबत नियोजन करावे व याचा गैरवापर होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना बच्चू कडू यांनी दिल्या.

Web Title: Citizens should stay at home during communication ban - Bachchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.