नागरिकांनी शास्ती अभय योजनेचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:13+5:302021-03-29T04:12:13+5:30
मनपा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात आले आहे लक्षणे असतील तर चाचणी करा अकोला महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला ...
मनपा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात आले आहे
लक्षणे असतील तर चाचणी करा
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व कोरोना सदृष्य लक्षणे असतील त्यांनी आपली झोन अंतर्गत सुरू असलेल्या कोव्हीड-19 चाचणी केंद्रावर जाउन किंवा मनपाव्दारे सुरू करण्यात आलेल्या मोबाईल कोव्हीड चाचणी बस मध्ये कोरोना चाचणी करावी असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे
थकीत करापोटी मालमत्तांवर सील
अकोला महानगरपालिका दक्षिण क्षेत्रांतर्गतील सिंधी कॅम्प पक्की खोली येथील वार्ड क्र. डी-३ मा.क्र. ९५२ श्री. रेणुमल धनशामल जेठाणी यांचेकडे सन १७×१८ ते २०×२१ चा एकुण मालमत्ता कर १,१७,२२४ बाकी असल्याने त्यांच्या गोडाऊन ला सिलची कार्यवाही करण्यात आली
साई राम भरोसे मित्र मंडळ तर्फे वृक्षारोपण
अकोला:- रमेश नगर,गोंड पुरा डाबकी रोड येथील नागरिक व महिलांनी पुढाकार घेत "क्लीन अकोला ग्रीन अकोला" चा उपक्रम राबवित कस्तुरबा गांधी रुग्णालय,बौद्ध विहार,देवी मंदिर या भागात स्वस्च्छता अभियान राबवित वृक्षारोपण केले.यावेळीसागर बेलूरकर,संतोष सहारे डॉ.राहुल रामटेके, राम कोकाटे,इंगळे सर,शांताराम सिरसाट ,धर्मा चक्रनारायण, योगेश टेकाम, रवी राउत,साकुल उइके सचिन टेकाम,उपस्थित होते.
बाजार समितीमध्ये रेपिड एंटीजन टेस्ट शिबिर
अकोला:- कृषि उत्पन्न बाजार समिति मधील आलु, कांदा मंडी मार्केट मध्ये निशुल्क कोरोना रेपीड एंटीजन टेस्ट शिबिराचे आयोजन केले होते शिबिराचे उदघाटन उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांचे हस्ते करण्यात आले तर अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संतोष बजाज, कृषीउत्पन्न बाजार समिती पर्यवेक्षक प्रशांत पाटिल, नगरसेवक आशीष पवित्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती
जैन मंदिरा कडून गो शाळेला आर्थिक मदत,
अकोला :- अंतरिक्ष पर्शवनाथ संस्थान शिरपूर जैन मंदिरा कडून आणि संस्थेचे विश्वस्तदिलीपभाई नवलचंदजी शहा यांच्या सहकार्याने दरवर्षी जय सेवालाल गौरक्षण संस्थान जनुना ता,बार्शीटाकळी या गोशालेला आर्थिक मदत देण्यात येते, यंदाही सदर देणगी गोमाता गोवंशाच्या चारा पाणी करीता देण्यात आली या गो शाळेत लहान मोठे 210 दोनशे दहा जनावरे आहे,अशी माहिती जय सेवालाल गौरक्षण संस्थान चे संस्थापक अध्यक्ष संतोष राठोड यांनी दिली