सततच्या विद्युत पुरवठा खंडितमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:54+5:302021-06-16T04:26:54+5:30
येथील वीज केंद्राशी निगडित असलेले नकाशी, भरतपूर, देगाव, तामशी, पिंपळगाव, धाडी बल्लाडी, तांदळी आदी गावांचा कारभार या ठिकाणावरून पाहिला ...
येथील वीज केंद्राशी निगडित असलेले नकाशी, भरतपूर, देगाव, तामशी, पिंपळगाव, धाडी बल्लाडी, तांदळी आदी गावांचा कारभार या ठिकाणावरून पाहिला जातो, परंतु या पावसाळ्यात नेहमी वीजपुरवठा खंडित होत असल्याने, या भागातील वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत, तसेच या ठिकाणी ग्राहकाला कोटेशनची आवश्यकता असल्यास, त्यांना बाळापूर येथील कार्यालयात संपर्क करावा लागतो किंवा भाडे खर्च करून मजुरी कामे सोडून जावे लागते. स्थानिक ठिकाणी प्रभारी अधिकरी उपस्थित राहत नसल्याने, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तसेच अनेकांना
बिलाची समस्या, मीटर तक्रारी येतात, परंतु या तक्रारी निवारणासाठी बाळापूरला जावे लागते. अनेक वीज ग्राहकांना कोटेशन मिळत नाही. वीज संबंधित कामे करण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी अभियंता अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
प्रभारी अधिकारी या ठिकाणी असूनही काम होत नाही. त्यामुळे बाळापूर जावे लागत आहे. संबंधित विभागाने कायमस्वरूपी अभियंता देण्यात यावा.
- राजेश डी.मानकर, शेतकरी वाडेगाव
पावसाळ्याच्या दिवसात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने संकटांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी देण्यात यावा.
- राधेश्याम कळसकार
शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. कायमस्वरूपी अधिकारी देण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरच समस्या दूर करण्यात येईल.
- आशिष कलावते, उपकार्यकारी अभियंता बाळापूर