सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:27+5:302021-07-08T04:14:27+5:30
पावसाळ्याचे दिवस असल्यावरही उन्हाळ्यासारखी कडक ऊन तापत असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यात हे वीजपुरवठा वेळोवेळी खंडित ...
पावसाळ्याचे दिवस असल्यावरही उन्हाळ्यासारखी कडक ऊन तापत असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यात हे वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होत आहे. रात्री-बेरात्री, दिवसा कधीही वीजपुरवठा खंडित होताे. अनेकदा ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागते. थोडा पाऊस आला, तरी वीजपुरवठा तासंतास खंडित करण्यात येतो. ६ जुलै रोजी सातत्याने वीजपुरवठा खंडित झाला. ७ जुलै रोजी दुपारी वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर एकदम सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. लॉकडाऊन असल्यामुळे ग्रामीण भागात सायंकाळनंतर सर्व प्रतिष्ठाने दुकाने बंद राहत असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. पीठ गिरण्या बंद राहतात. कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी ताटकळत बसावे लागते. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे मोबाइल चार्जिंग नसला की, त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खूप दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. रात्रीही वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यामुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे.
-शेख सुलेमान शेख बाबू, नागरिक दहीहांडा