सरोवर परिसरातील सीताफळांच्या झाडांची कत्तल
By admin | Published: October 9, 2014 12:34 AM2014-10-09T00:34:02+5:302014-10-09T00:34:02+5:30
लोणार सरोवर अभयारण्य घोषित झाले असले तरी वृक्षतोड सर्रास सुरू; रानमेवा मिळणे दुरापास्त.
लोणार : जगप्रसिद्ध लोणार सरोवर ज्याप्रमाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे लोणार सरोवरा तील रानमेवा समजले जाणारे सीताफळही गोडव्यासाठी प्रसिद्ध आहे. या सीताफळाला इतर प्रांतातही मागणी होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून सरोवरातील सीताफळाच्या झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे सीताफळाचा गोडवा हरवत आहे.
लोणार सरोवराच्या जवळपास ५-६ किलोमीटरच्या परिघात लाखो सीताफळांची झाडे होती. या झाडांमुळे नागरिकही तलावात जाण्यासाठी धजावत नव्हते. ऐन सीताफळाच्या हंगामात दसरा ते दिवाळी या काळात सीताफळांची गोडी चाखण्यासाठी अबालवृद्ध सरोवर परिसरात जायचे. या सी ताफळाची गोडी प्रसिद्ध असल्याने येथील सीताफळ स्थानिक नातेवाईकही आपल्या लांबच्या संबंधि ताना पाठवित असत. यामुळे पुढे-पुढे सरोवरातील सीताफळाला पैसे देऊन मागणी वाढू लागली. कारण हे सीताफळ मोठय़ा आकारात रहायचे. वन विभागाने या सीताफळाच्या झाडांची हर्रासी सुरु केली होती. त्यातून वनविभागाला मोठय़ा प्रमाणात मोबदला मिळायचा. लोणार सरोवर अभयारण्य घोषित झाल्यापासून वनविभागाने सीताफळाच्या झाडांची हर्रासी थांबविली; मात्र वृक्षांची तोड वाढल्याने पूर्वी लाखोच्या संख्येत असलेली ही झाडे केवळ ४0 हजारापर्यंत येऊन ठेपली आहेत. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
*दरवर्षी ७0 टन सीताफळांचे उत्पादन
सरोवर परिसरातील लाखो सीताफळाच्या झाडांपासून सुमारे ६0 ते ७0 टन सीताफळाचे उत्पादन दरवर्षी होत होते; परंतु मोठय़ा प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे सरोवरातील सीताफळाचे प्रमाण घटले आहे. मोठय़ा आकाराची सीताफळ खाण्यासाठी चविष्ट असल्यामुळे सरोवरातील सीताफळांची मोठी मागणी मुंबई, नाशिक, बुलडाणा, पुणे, जळगाव, वाशिम, अमरावती, अकोला या भागातून होते.