शहरात १९७ जण काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:02+5:302021-05-19T04:19:02+5:30

१,०९४ जणांनी केली चाचणी अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून, अनेकांना काेराेनाची लागण हाेत आहे़ नागरिकांनी लक्षणे आढळून ...

In the city, 197 people tested positive | शहरात १९७ जण काेराेना पाॅझिटिव्ह

शहरात १९७ जण काेराेना पाॅझिटिव्ह

Next

१,०९४ जणांनी केली चाचणी

अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून, अनेकांना काेराेनाची लागण हाेत आहे़ नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास तातडीने काेराेना चाचणी करणे अपेक्षित आहे़ मंगळवारी शहरात १,०९४ जणांनी चाचणी केली़ यामध्ये ३२५ जणांनी आरटीपीसीआर तसेच ७६९ जणांनी रॅपिड ॲन्टीजेन चाचणी केली आहे़ संबंधितांचे अहवाल तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत़

वादळी वाऱ्याने वृक्ष काेलमडले

अकाेला: शहरात मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडल्याचे समाेर आले़ जठारपेठ परिसर, उमरी परिसर यासह मुख्य रस्त्यांलगत वृक्ष काेलमडले़ याची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाच्यावतीने असे वृक्ष बाजूला सारण्याचे काम हाती घेण्यात आले हाेते़ विद्युत पुरवठा खंडित असल्याने काम करताना अडथळा निर्माण झाला हाेता़

जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

अकाेला: जुने शहरातील डाबकी राेड भागात गाेळे यांच्या स्वस्त धान्य दुकानासमाेरील अंतर्गत रस्त्यावरील जलवाहिनीला गळती लागल्याचे मंगळवारी दिसून आले़ यामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजूला पाण्याचे लाेट पसरले हाेते़ जलवाहिनीला गळती लागल्याने त्याद्वारे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा हाेत आहे़ याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची गरज आहे़

सिव्हिल लाइन रस्ता ठरताेय जीवघेणा

अकाेला: शहरातील वर्दळीचा असलेल्या नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाइन चाैकपर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहीन ठरला असून उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.

उड्डाणपुलामुळे रस्त्यावर खड्डे

अकाेला: शहरात माेठा गाजावाजा करीत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु पुलाच्या दाेन्ही बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना कंत्राटदाराने सपशेल दुर्लक्ष केले आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे.

Web Title: In the city, 197 people tested positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.