शहरात ७५ जण काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:15 AM2021-06-02T04:15:48+5:302021-06-02T04:15:48+5:30

११२४ जणांनी केली काेराेना चाचणी अकाेला : शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या ...

In the city, 75 people tested positive | शहरात ७५ जण काेराेना पाॅझिटिव्ह

शहरात ७५ जण काेराेना पाॅझिटिव्ह

Next

११२४ जणांनी केली काेराेना चाचणी

अकाेला : शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे ११२४ जणांनी मंगळवारी चाचणी केली. यामध्ये १५६ जणांनी आरटीपीसीआर व ९६८ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

अनुकंपाधारक नियुक्तीच्या प्रतीक्षेत

अकाेला : मागील अनेक वर्षांपासून महापालिकेत नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ७८ अनुकंपाधारक उमेदवारांची प्रशासनाकडून उपेक्षा केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे निवेदन सादर करून नियुक्ती करण्याची मागणी केली हाेती. आज रोजी यातील १२ लाभार्थ्यांचे वय निघून गेल्यामुळे ते नियुक्तीसाठी अपात्र ठरले आहेत.

प्रभाग २ मध्ये रस्त्यांची दुरवस्था

अकाेला : अकाेटफैल भागातील प्रभाग क्रमांक २ मध्ये परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे मनपा प्रशासन व नगरसेवकांप्रति रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या समस्यांची दखल घेत मनपा प्रशासनाने दलित वस्ती सुधार याेजनेतून रस्त्याचे नियाेजन करण्याची मागणी समाेर आली आहे.

जलकुंभ परिसरात साचले पाणी

अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आउटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे. जलकुंभाच्या आवारभिंतीलगत नागरिक उघड्यावर लघुशंका करीत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य

अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या शिवचरण पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैक परिसरात भाजीपाला विक्री केली जाते. भाजीपाला व फळ विक्री केल्यानंतर सदर व्यावसायिक सडका भाजीपाला रस्त्यालगत उघड्यावर फेकून देत असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकाचे दुर्लक्ष हाेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

बाजारात गर्दी; नियम पायदळी

अकाेला : संसर्गजन्य काेराेना विषाणूचा आलेख कमी हाेत चालल्याचे चित्र आहे. दरम्यान, ही बाब लक्षात घेता शासनाने निर्बंध शिथिल करीत व्यवसाय सुरू करण्यासाठी दुपारी २ वाजतापर्यंत परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बाजारात साेशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवित गर्दी हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे.

आराेग्य निरीक्षकांची धावाधाव

अकाेला : महापालिकेच्या स्वच्छता व आराेग्य विभागात मंजूर पदस्थापनेपेक्षा जास्त आराेग्य निरीक्षकांची जास्त संख्या हाेती. त्यामुळे यातील १४ कंत्राटी आराेग्य निरीक्षकांची सेवा आयुक्त निमा अराेरा यांनी बंद केली. त्यामुळे उर्वरित २० आराेग्य निरीक्षकांकडे प्रत्येकी एका प्रभागाची जबाबदारी साेपविण्यात आली. मंगळवारी सेवारत आराेग्य निरीक्षकांची चांगलीच धावाधाव हाेत असल्याचे दिसून आले.

Web Title: In the city, 75 people tested positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.