महापालिकेत काँग्रेस नगरसेवकावर प्राणघातक हल्ला!
By admin | Published: December 8, 2015 02:21 AM2015-12-08T02:21:21+5:302015-12-08T02:21:21+5:30
नगरसेविकेचा पती व सहकार्यांकडून जुन्या वादातून हल्ला; अब्दुल जब्बार गंभीर जखमी.
अकोला: काँग्रसचे नगरसेवक अब्दुल जब्बार यांच्यावर जुन्या वादातून मब्बा पहिलवान व त्यांच्या आठ ते दहा सहकार्यांनी हल्ला चढविला. लोखंडी पाइप व खुच्र्यांंनी मारहाण केल्याने अब्दुल जब्बार हे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरापर्यंंत मब्बा पहिलवान यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरातील प्रभाग क्रमांक १५ अ मधील काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल जब्बार अब्दुल रहमान यांच्या तक्रारीनुसार, काँग्रेसच्या नगरसेविका शाहीन अंजुम यांचे पती महबूब खान ऊर्फ मब्बा पहिलवान यांच्यात गत काही महिन्यांपासून वॉर्डांंतील कामांच्या विषयांवरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ल्यात झाले. यापूर्वीदेखील नगरसेवक अब्दुल जब्बार व मब्बा पहिलवान यांच्यात वाद झाले हो ते; परंतु महापालिकेतील काही पदाधिकार्यांनी हस्तक्षेप करून हे वाद मिटविले होते. गत काही दिवसांपासून दोघांमधील वादाला पुन्हा तोंड फुटले. सोमवारी दुपारी अब्दुल जब्बार राणी सतिधाम मंदिरासमोरून जात अस ताना, मब्बा पहिलवान व त्यांच्या सहकार्यांनी अडविले आणि अब्दुल जब्बार यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळही केली. यादरम्यान त्यांच्यात झटापट झाली. अब्दुल जब्बार यांनी कशीबशी आपली सुटका करून घेत थेट महापालिका कार्यालय गाठले आणि विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांच्या कक्षात जाऊन बसले. या ठिकाणी मब्बा पहिलवान व त्यांच्या सहकार्यांनी येऊन पुन्हा वाद घातला. साजिद खान पठाण व सहकार्यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु वाद विकोपाला गेल्याने मब्बा पहिलवान व त्यांच्या सहकार्यांनी सोबत आणलेल्या लोखंडी पाइपने आणि कक्षातील खुच्र्या उचलून जब्बार यांच्या हल्ला चढविला. यात जब्बार यांच्या डोक्याला, खांद्याला जबर मार लागला. साजिद खान व त्यांच्या सहकार्यांनी अब्दुल जब्बार यांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अब्दुल जब्बार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मब्बा पहिलवान यांच्यासह अन्वर खान बिलावर खान, राशीद खान अन्वर खान आणि मब्बाचा मुलगा यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२६,५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला.