शहरात उत्तर झाेनमध्ये नियम धाब्यावर;नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:31+5:302021-05-19T04:18:31+5:30
जीवघेण्या काेराेना विषाणूची लागण हाेऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे़ ताेंडाला मास्क व हाताला सॅनिटायझर न लावणे तसेच ...
जीवघेण्या काेराेना विषाणूची लागण हाेऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे़ ताेंडाला मास्क व हाताला सॅनिटायझर न लावणे तसेच आपसांत किमान चार फूट अंतर राखून संवाद न साधण्याचे परिणाम सर्वांनाच भाेगावे लागत आहेत़ जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची व ऑक्सिजनची कमतरता निर्माण हाेत आहे़ एकूणच, काेराेनाचा माेठ्या प्रमाणात फैलाव झाल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट हाेत चालली आहे़ यावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून १५ मे पर्यंत जिल्ह्यात लाॅकडाऊन लागू केले हाेते़ या कालावधीत पाेलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावत कर्तव्य निभावले़ दरम्यान, शहराच्या पश्चिम व उत्तर झाेनमधील काही भागात जिल्हा प्रशासनाचे निर्देश बासनात गुंडाळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ बंदाेबस्तावरील पाेलिसांना न जुमानता या झाेनमधील नागरिक,तरुण व लहान मुलांचा रस्त्यांवर मुक्त संचार दिसून येताे़ त्यामुळे काेराेनाची साखळी कशी खंडित हाेणार, असा सवाल सुज्ञ अकाेलेकर उपस्थित करीत आहेत़
रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरु
पश्चिम झाेनमध्ये डाबकी राेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरमाेहम्मद प्लाॅट, भगतवाडी, आरपीटीएस राेड,जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हमजा प्लाॅट,साेनटक्के प्लाॅट तसेच उत्तर झाेनमधील सिटी काेतवाली हद्दीतील काला चबुतरा, बैदपुरा,माेहम्मद अली चाैक तसेच अकाेटफैल पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील बहुतांश भागात रात्री १२ पर्यंत किराणा दुकाने, पान टपऱ्या सुरु असतात़ याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष का,असा सवाल उपस्थित हाेत आहे़
काेराेनाला ‘ब्रेक’कसा?
काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी ज्या भागात नियमांचे पालन हाेते नेमके त्याच भागात पाेलिसांकडून गस्त घातली जाते़ इतर भागात नागरिकांचा मुक्तसंचार पाहता काेराेनाला ‘ब्रेक’कसा लागेल,असा सवाल उपस्थित झाला आहे़