बेशीस्त ऑटाेचालकांवर सिटी काेतवाली पाेलिसांची कारवाई
By सचिन राऊत | Published: November 17, 2023 05:42 PM2023-11-17T17:42:45+5:302023-11-17T17:42:56+5:30
या ऑटाेचालकांकडून दंडही वसूल करण्यात आला असून यापुढे वाहतुकीचे नियम न पाळल्यास त्यांचे ऑटाे काही दिवसांसाठी पाेलिस ठाण्यात लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
अकाेला : शहरात बेशीस्त वाहतुकीने कळस गाठला असून यावर नियंत्रण लावण्यासाठी सिटी काेतवाली पाेलिसांनी बाजारपेठेत बेशीस्त वाहतुक करणाऱ्या ऑटाेचालकांवर शुक्रवारी कारवाइ करण्यात आली. या ऑटाेचालकांकडून दंडही वसूल करण्यात आला असून यापुढे वाहतुकीचे नियम न पाळल्यास त्यांचे ऑटाे काही दिवसांसाठी पाेलिस ठाण्यात लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत जिल्हयातील सर्वात माेठी बाजारपेठ असून दिवाळीच्या खरेदीसाठी या परिसरात माेठी गर्दी आहे. अशातच ऑटाेचालक नियम न पाळता वाहतुक करीत असल्याने कीरकाेळ अपघात हाेत आहेत. यासह वाहतुकीसही माेठा खाेळंबा हाेत असल्याने सिटी काेतवाली पाेलिसांनी या ऑटाेचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर या परिसरातील ऑटाेचालकांवर दंडात्मक कारवाइ केली आहे. ही कारवाइ ठाणेदार सुनील वायंदडे यांच्या मार्गदर्शनात महेंद्र बहादुरकर, विजय मुलनकर, शिरसाट यांच्यासह पाेलिस कमचाऱ्यांनी केली.