सिटी राऊंडअप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:55+5:302021-07-19T04:13:55+5:30
अकोला : दोन-तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळच्या सुुमारास पावसाचे आगमन झाले. जवळपास १ तास झालेल्या पावसामुुळे डाबकी रोड व ...
अकोला : दोन-तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळच्या सुुमारास पावसाचे आगमन झाले. जवळपास १ तास झालेल्या पावसामुुळे डाबकी रोड व उमरी रस्त्यावर खोलगट भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जोराने जात असलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांवर पाणी उडण्याचे प्रकार घडत आहे.
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी
अकोला : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शहरातील शाळा, काॅलेज बंद आहे; परंतु नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने ॲडमिशन व पुढील परीक्षा सत्राचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये गर्दी केली आहे. शहरातील आरडीजी महाविद्यालय, आरएलटी महाविद्यालय येथे विद्यार्थी मोठ्या संख्येने दिसून येत आहे.
शैक्षणिक पास सुरू करण्याची मागणी
अकोला : दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील बसेसही बंद आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे हळूहळू शाळा सुरू होत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शाळा सुरू झाल्या आहे; मात्र ग्रामीण भागातील बसेस अद्यापही बंद आहे. शाळेत जाण्यासाठी मुख्य मार्गावरून धावणाऱ्या एसटी बसेसचा आधार या विद्यार्थ्यांना होत आहे. या बसेसने जाण्यासाठी शैक्षणिक पास तयार करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.