शहरात वेगाने पसरताेय काेराेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:27+5:302021-03-15T04:17:27+5:30
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे पाहून मनपा प्रशासन सैरभैर झाल्याचे दिसत आहे. रविवारी जिल्हा सामान्य ...
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे पाहून मनपा प्रशासन सैरभैर झाल्याचे दिसत आहे. रविवारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून शहरातील तब्बल ३८४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल मनपाला प्राप्त झाला. दरम्यान, पूर्व व दक्षिण झाेनमध्ये नागरिकांच्या बेफिकीरीमुळे काेराेनाचा कहर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. संसर्गजन्य काेराेनामुळे नागरिकांचे मृत्यू हाेत असले तरीही अकाेलेकरांना या साथराेगाचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी बंधनकारक केली. त्यामुळे शहरातील व्यापारी, दुकानांमधील कामगारांनी चाचणीसाठी पुढाकार घेतला आहे. यादरम्यान काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. शहरात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असून अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, यामुळे मनपा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.
पूर्व, दक्षिण झाेन अनियंत्रित
शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये वाढली आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. रविवारीदेखील पूर्व झोन अंतर्गत १७१, पश्चिम झोन अंतर्गत ५८, उत्तर झोन अंतर्गत ३८ आणि दक्षिण झोन अंतर्गत ११७ असे एकूण ३८४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
७८१ जणांनी केली चाचणी
काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहरातील एकूण ७८१ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.
मनपाचे पूर्व, दक्षिण झाेनकडे दुर्लक्ष
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाची लागण हाेणाऱ्या रुग्णसंख्येत माेठी वाढ झाल्याचे समाेर आले आहे. या दाेन्ही झाेनमधील नागरिकांचे बेजबाबदार वर्तन, काेराेनाबद्दल कमी झालेली धास्ती काेराेनाच्या प्रसारासाठी पाेषक ठरली आहे. मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी उपराेक्त दाेन्ही झाेनमध्ये ठाेस उपाययाेजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.