शहराचा पाणीपुरवठा सुरू; काही भागात गढूळ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:46+5:302021-05-27T04:20:46+5:30
मूर्तिजापूर व खांबाेरा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेअंतर्गत महान धरणातून उन्नइ बंधाऱ्यापर्यंत पाणीपुरवठा केला जाताे. जलवाहिनीचे जाळे टाकल्यास पाण्याचा माेठ्या प्रमाणात ...
मूर्तिजापूर व खांबाेरा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेअंतर्गत महान धरणातून उन्नइ बंधाऱ्यापर्यंत पाणीपुरवठा केला जाताे. जलवाहिनीचे जाळे टाकल्यास पाण्याचा माेठ्या प्रमाणात हाेणारा अपव्यय टाळता येणार आहे. त्याअनुषंगाने महान धरण ते उन्नइ बंधाऱ्यापर्यंत ६०० व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला २३ मे राेजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या यंत्रणेने प्रारंभ केला. त्यासाठी महान धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मनपाच्या ६०० व्यासाच्या जलवाहिनीला जाेडणी करण्यात आली. सदर कामासाठी दाेन दिवसांचा अवधी लागणार असल्याने २४ व २५ मे राेजी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला हाेता.
दरम्यान, सदरचे काम पूर्ण हाेताच मनपाच्या जलप्रदाय विभागाने बुधवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरू केला. यावेळी काही भागात गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे समाेर आले.
जाेडणीदरम्यान जलवाहिनीत माती
जलवाहिनीची जाेडणी करताना मनपाच्या जलवाहिनीत थाेड्याफार प्रमाणात मातीचा शिरकाव झाला. त्यामुळे मनपाने पाणीपुरवठा सुरू करताच काही नागरिकांना गढूळ पाणी मिळाले. जलप्रदाय विभागाने रात्री ८ वाजता ही समस्या निकाली काढली.
अपुरे कर्मचारी; जलप्रदाय विभागाची दमछाक
पाणीपुरवठा ही अत्यावश्यक बाब असल्याने जलप्रदाय विभागामार्फत डाेळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागील काही दिवसांपासून चांगलीच दमछाक हाेत असल्याचे दिसत आहे. महान येथील धरण व जलशुध्दीकरण केंद्रातील काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून काहींना सेवेतून कमी करण्यात आले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी लक्ष देऊन ही समस्या निकाली काढण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.