नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या अडचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:36 PM2017-10-30T17:36:01+5:302017-10-30T17:39:44+5:30

अकोला : पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

Civilians poot problems before the Guardian Minister! |  नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या अडचणी !

 नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या अडचणी !

Next
ठळक मुद्देजनता दरबार समस्या तातडीने निकाली काढण्याचे पालकमंत्र्याचे निर्देश




अकोला : पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यामध्ये शेतकºयांसह नागरिकांनी विविध समस्या आणि अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाºयांना यावेळी दिले.
पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधत, विविध समस्या, अडचणी आणि तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच निवेदनेही स्वीकारली. शेतकºयांसह नागरिकांनी प्रामुख्याने शेतरस्ता, शेतीविषयक प्रश्न, पाणीपुरवठा, सिंचन विभागाशी निगडीत समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. तसेच सेवेतून कमी करण्यात आलेल्या कलाशिक्षकांसह नागरिकांनी सादर केलेली विविध मागण्यांची निवेदनेही पालकमंत्र्यांनी स्वीकारली. नागरिकांच्या अडचणी ऐकूण घेत, संबंधित समस्या आणि तक्रारींवर तातडीने योग्य त्या उपाययोजना करुन, समस्या निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविदं्र निकम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Civilians poot problems before the Guardian Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार