पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 02:05 PM2018-09-14T14:05:54+5:302018-09-14T14:06:07+5:30
अकोला - शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाºयांमध्ये ड्युटीच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.
अकोला - शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाºयांमध्ये ड्युटीच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. यामधील एक महिला कर्मचारी गर्भवती असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.
पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठांकडून कनिष्ठ पोलीस कर्मचाºयांना त्रास देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गत काही महिन्यांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर आखाडा पोलीस ठाण्यात एका पीएसआयला वरिष्ठाचा त्रास असल्याने तो बेपत्ता झाल्याच्या घटनेची चर्चा सुरू असताना शहरातील एका पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी भारती व वैशाली नामक महिला पोलीस कर्मचाºयांमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्याने आणि त्या वादाकडे वरिष्ठांच्या दुर्लक्षाने दोघींमध्ये हाणामारी झाली.
पोलीस ठाण्यांमध्ये मर्जीतील कर्मचाºयांना सर्व सोयीच्या ड्युट्या देण्यात येतात, तर काही कर्मचाºयांना दिवसा ड्युटी झाल्यानंतरही रात्रपाळीवर बोलवण्यात येते; मात्र शिस्तीचे खाते असल्याने बोलण्याची सोय नाही. अशा घटनांमुळे कर्मचाºयांमध्ये वाद निर्माण होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचते. अधिकाºयांची भूमिका समन्वयाची असली तर समस्या निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा कर्मचाºयांकडून व्यक्त करण्यात येते.