म्हैसांग येथे दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:37 AM2017-09-21T01:37:46+5:302017-09-21T01:39:51+5:30
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
म्हैसांग येथील सर्व्हे नं २५ मध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात उत्तरेला जवळपास ७५ एकर गायरान जमीन आहे. त्या जमिनीवर गावातील काही लोकांनी मागील १५ वषार्ंपासून अतिक्रमण केले असून, त्यावर ते लोक पीक घेतात; परंतु गावातील नागरिकांनी त्यांच्या जनावरांना चरायला गायरानाची जमीन शिल्लक नसल्याने ग्रामपंचायतीला ते अतिक्रमण काढण्यास सांगितले. त्यानुसार सन २0१२ मध्ये ग्रामपंचायतीने गायरानावरील अतिक्रमकांना जमीन खाली करण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. त्याला विरोध करीत अतिक्रमकांनी नागपूर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यामुळे सदरचे प्रकरण हे न्यायालयीन असल्याने सदर प्रकरण विभागीय आयुक्तांकडे आहे, असे लोकांना सांगण्या त आले. त्याला न जुमानता गावातील शेकडो नागरिक आणि ग्रामपंचायत प्रशासनाने बोरगाव मंजू ठाणेदार पी. के. काटकर यांना पोलीस संरक्षण मागितले होते; पण सदरचे प्रकरण हे न्यायालयीन असल्याने त्यात पोलिसांना बंदोबस्त देता येत नाही, असे ठाणेदार काटकर यांनी समजावले, त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिकांनी १७ तारखेला अमरावती विभागीय आयुक्तांना भेटून या गायरान जमिनीबाबत काही प्रकरण आपल्या स्तरावर प्रलंबित आहे का, असे विचारले असता, विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडे असे कोणतेच प्रकरण प्रलंबित नाही, असे लेखी पत्र ग्राम पंचायतीला दिले, त्यामुळे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र देशमुख, पोलीस पाटील सुनील पायदाळे, सरपंच उषा गवई, ग्रा.पं. सदस्य गजानन बाभुळकार आणि गावातील नागरिक असे सर्व जण गावालगत असलेल्या गायरान शेतात त्यांच्यासोबत जनावरे घेऊन गेले. तेव्हा तेथे दोन्ही गटात प्र थम शाब्दीक वाद होऊन नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अतिक्रमकांमधील श्रीकृष्ण तायडे, गणेश तायडे, ज्योती सोळंके, गणेश सोळंके, दिलीप सोळंके, मारोती गवई, वंदना गवई, प्रतिभा गवई, दुर्गा सावळे हे नऊ नागरिक जखमी झाले, तसेच यावेळी दुसर्या गटात असलेले गावातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले. यामुळे म्हैसांग गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ठाणेदार पी. के. काटकर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जखमींना अकोला येथे उपचारार्थ भरती केले असून, दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल आणि अटक करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, म्हैसांग गावात आता शांतता असून, गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.