श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये नववी-दहावीचे वर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:34+5:302020-12-04T04:53:34+5:30

अकोला: येथील श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये नववी-दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत या प्रसंगी बाेलतांना समर्थ पब्लिक स्कूलचे ...

Classes IX-X start in Shri Samarth Public School | श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये नववी-दहावीचे वर्ग सुरू

श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये नववी-दहावीचे वर्ग सुरू

googlenewsNext

अकोला: येथील श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये नववी-दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत या प्रसंगी बाेलतांना समर्थ पब्लिक स्कूलचे प्रा. नितीन बाठे यांनी गेल्‍या काही महिन्यांपासून कोरोना संकटामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांतील जवळपास बंदच झालेला संवाद पुन्हा सुरू होत असल्‍याचा मनापासून आनंद होत असल्‍याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

समर्थ पब्लिक स्कूलमध्ये शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरू करीत आहोत, असे सांगताना प्रा. बाठे म्‍हणाले की, शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात दिलेल्‍या प्रत्येक सूचनेचे, त्या सूचनेतील प्रत्येक शब्‍दाचे कटाक्षाने पालन आम्‍ही केले आहे आणि यापुढेही करू, अशी ग्‍वाही त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या वतीने दिली.

विद्यार्थी आणि शिक्षकांसह शाळेतील प्रत्येक घटकाच्या आरोग्‍याची काळजी घेणे, ही जशी शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, तशीच ती विद्यार्थी व त्यांच्या पालकांचीही आहे. आपण सर्वच पालक सुजाण आहात. त्यामुळे काय काळजी घ्यावी, हे अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. पालकांकडून आम्‍हाला योग्‍य ते सहकार्य वेळोवेळी मिळाले तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात दिलेल्‍या सूचनांप्रमाणे व्यवस्थापनाने पूर्ण काळजी घेतली आहे. शाळेचे कर्मचारी, शिक्षक यांच्यासह समर्थ पब्लिक स्कूलचा अध्यक्ष या नात्याने मी स्वतःही कोविड-१९ ची चाचणी करून घेतली आहे. शाळेत जंतुनाशक, साबण, पाणी, सॅनिटायझरची व्यवस्था आवश्यक त्या सगळ्याच ठिकाणी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक अंतर ठेवण्याच्या अटीचे पालन होईल याकडेही आम्‍ही लक्ष देणार आहोतच. तसेच, सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक नाही. विद्यार्थी आपल्‍या पालकांच्या संमतीनुसार शाळेत यायचे किंवा नाही, हे ठरवू शकतात. पण, तशी स्पष्ट सूचना पालकांनी शाळा व्यवस्थापनाला आगाऊ द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी पालकांना केली. यावेळी शाळेच्या संचालिका जयश्री नितीन बाठे यावेळी उपस्थित होत्या.

Web Title: Classes IX-X start in Shri Samarth Public School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.