पशु आरोग्य अबाधित ठेवण्याकरीता स्वच्छ पाणी आवश्यक : अनिल भिकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:18 AM2021-02-14T04:18:05+5:302021-02-14T04:18:05+5:30
या प्रसंगी प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांचेही मार्गदर्शन झाले. दूषित पाण्यामुळे जनावराना त्वचेचे विकार होणे, गर्भपात होणे, ...
या प्रसंगी प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांचेही मार्गदर्शन झाले. दूषित पाण्यामुळे जनावराना त्वचेचे विकार होणे, गर्भपात होणे, हगवण लागणे असे विकार होतात त्यामुळे गावातील धर्माळ्याची नियमित स्वच्छता राखणे आवश्यक असून महिन्यातून किमान एक वेळेस धर्माळ्यातील आतील बाजूस चुन्याने रंगरंगोटी करावी जेणेकरून शेवाळ वाढणार नाही असे सांगितले. या प्रसंगी प्रा.डॉ. सुनील वाघमारे, अकोला पंचायत समिती सदस्या शुभांगी गोपाळराव भटकर, उमा माळी, अर्चना चोपडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भाकरे , बाबाराव वंजारे व गजानन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. एम .आर.वडे, संचालन डॉ. महेश इंगवले, आभार डॉ. गिरीश पंचभाई यांनी केले. डॉ. प्रशांत कपले, भौरदचे पशुधन पर्यवेक्षक आर एफ सय्यद व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.