मुस्लीम स्लम भागात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:34 PM2017-10-03T20:34:58+5:302017-10-03T20:35:07+5:30
अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अं तर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्थानिक नवीन बैदपुरा परिसरातील मुस्लीमबहुल परिसरातील स्लम भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाजप अल्पसंख्याक सेल आणि येथील रहेबर कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्या त आली. शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि भाजप अल्पसंख्याक पदाधिकारी यांनी स्वच्छतेचा संदेश येथे दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क

सोमवारी रहेबर कॉन्व्हेंटमध्ये महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम घेतला गेला. भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चांद खान येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी येथे मोलाचे मार्गदर्शन केले. चौदाशेमध्ये मुस्लीम धर्माचे पहिले हदीस यांनीदेखील स्वच्छतेला फार महत्त्व दिले होते. स्वच्छतेत अर्धे इमान त्यांनी मानले आहे. त्या दिशेने आपण वाटचाल करून आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावे, जेणेकरून आ पण रोगराईला दूर ठेवू शकतो. असे आवाहनही त्यांनी केले. परिसरातील सर्व्हिस लाइन, नाल्या साफ करण्यात आल्यात. दारासमोरील पडदे दोन दिवस आडने स्वच्छ ठेवण्याचे आवाहन येथे करण्यात आले. डस्टबीन भेट देऊन जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत रहेबर कॉन्व्हेंटचे संचालक शकील खान, जावेद खान, कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक अबरार, मो. अनवर हुसेन, तहसीन हसन, जरिना अन्सार, फियाज खान,जमीर खान, फैजअली खान, सद्दाम खा, मुमताज, शिवशंकर धवले, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल जमीर अहमद खान यांनी तर आभार अरविंद जोध यांनी केले.