पणन महासंघ मार्चअखेर करणार कापूस खरेदी केंद्रे बंद!

By admin | Published: March 8, 2016 02:17 AM2016-03-08T02:17:56+5:302016-03-08T02:49:17+5:30

बाजारात २२0 लाख गाठी कापूस खरेदी ; सव्वाशे लाख गाठींची व्यापा-यांकडे साठवणूक.

Closing of cotton procurement centers by March to end by Marketing Federation! | पणन महासंघ मार्चअखेर करणार कापूस खरेदी केंद्रे बंद!

पणन महासंघ मार्चअखेर करणार कापूस खरेदी केंद्रे बंद!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला
यावर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने अल्पभूधारक, छोट्या शेतकर्‍यांकडील कापूस जवळपास संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ व भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) ची कापूस खरेदी केंद्रेही ठप्प पडली आहेत. परिणामी मार्चअखेर कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला आहे. दरम्यान, खाजगी बाजारात आजमितीस २२0 लाख गाठी कापूूस शेतकर्‍यांनी विकला असून, जवळपास १२५ लाख गाठीहून अधिक कापूस व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवूण ठेवल्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात यावर्षी ६५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत येथील शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील जवळपास कापूस विकला आहे, तर येथील २५ टक्के व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पणन महांसघाने यावर्षी अडीच लाख क्विंटल, तर सीसीआयने साडेपाच लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. दरम्यान, देशातील खासगी बाजारात जवळपास २२0 लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे. यावर्षी देशांतर्गत ३५६ ते ३५८ लाख गाठी कापूस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आहे. आतापर्यंत २२0 लाख गाठी कापसाची खरेदी झाल्याने जवळपास १२५ लाख गाठीच्यावर कापूस अद्याप बाजारात यायचा आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कापूस विकल्याने, १२५ लाखांच्यावर कापसाच्या ज्या गाठी आहेत, त्या व्यापार्‍यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवून ठेवल्या आहेत. यात काही सधन शेतकर्‍यांचाही समावेश आहे.
केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने यावर्षी कापसाचे हमीदर ४१00 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केले. तथापि, महाराष्ट्रात प्रतवारीचे निकष लावून ह्यझोडाह्णच्या नावाखाली अनेक ठिकाणी ३५00 रुपये क्विंटल दराने अल्पभूधारक शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. आर्थिक गरजेपोटी अल्पभूधारक शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कापूस विकला आहे.

Web Title: Closing of cotton procurement centers by March to end by Marketing Federation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.