ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांनो तूर, हरभरा या पिकांना जपा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:27+5:302020-12-15T04:35:27+5:30
असे आहे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) पीक - क्षेत्र ज्वारी ...
असे आहे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक - क्षेत्र
ज्वारी - ४५३
गहू - १०,२०५
हरभरा - ६१,३०८
हरभरा, तुरीला जास्त फटका
जिल्ह्यात हरभरा आणि तुरीची लक्षणीय पेरणी झाली असून, या पिकांपासूनच शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. परंतु, वातावरणातील बदल हे अळ्यांसाठी पोषक असल्याने सर्वाधिक फटका हा हरभरा आणि तूर या पिकांनाच बसणार आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
शेतकरी बंधुंनी आपल्या पिकांची पाहणी करावी व अळी ३ प्रति झाड किंवा पिसारी पतंगाची अळी १ ते ३ प्रति झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगाचे नुकसान आढळल्यास व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. तसेच गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.
आठवडाभर असेच वातावरण कायम राहिल्यास तूर आणि हरभरा पिकांना फटका बसू शकतो. मात्र, गहू पिकावर त्याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी पिकांची पाहणी करून गरजेनुसार फवारणी करावी.
- डॉ. डी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पीडीकेव्ही, अकोला