ढगाळ वातावरणाचा खरीप, रब्बी पिकांना धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:07 AM2019-12-17T11:07:22+5:302019-12-17T11:07:27+5:30
हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्मिती झाली आहे, या वातावरणामुळे रब्बी व खरीप हंगामातील पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. कापूस पिकांवरील बोंडअळीने पुन्हा डोके वर काढले असून, तूर, हरभरा पिकांना हे वातावरण पोषक ठरत आहे.
यावर्षीच्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तसेच खरीप हंगामातील कापूस, तूर आदी पिके शेतात उभी आहेत. तुरीला सध्या फुलांचा बहर व बहुतांश ठिकाणी शेंगा धरल्या आहेत. या वातावरणामुळे शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तर हरभºयावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तूर पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तूर पिकावर कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. हरभºयाची पेरणी उशिरापर्यंत सुरू होती.ज्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हरभरा पेरणी केली. तेथील हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.
सुरुवातीला मान्सून उशिरा पोहोचल्याने मूग, उडीद पीक हातचे गेले, नंतरच्या अतिपावसामुळे सोयाबीन काळे पडले आणि उत्पादनही घटले.
कपाशीचेही उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांची भिस्त तूर व रब्बी हंगामातील पिकांवर आहे; परंतु पाऊस पाठ सोडत नसून, सारखे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढण्याचीही शक्यता आहे.
फळ पिकांवर परिणाम
विदर्भाच्या उत्तर भागावर थंड आणि बाष्पयुक्त वाºयाची धडक होत असल्याने सध्या पाऊस पडत आहे. ही परिस्थिती आणखी एक ते दोन दिवस टिकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण मोकळे होऊन हळूहळू थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. हे वातवरण असेच राहिल्यास फळ पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण
२२ डिसेंबरपर्यंत तुरळक भागात ढगाळ वातवरण राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमान १५.० अंशावर राहण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबर रोजी किमान तापमान १६.० राहील. १८ ला ते २० डिसेंबरपर्यंत १५ अंश २१ ला १६.० अंश तर २२ डिसेंबर रोजी हेच किमान तापमान १७.० अंश राहण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया तर हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी नियमित शेताचे सर्वेक्षण करावे. किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शिफारसीनुसार कीटकनाशक फवारणी करावी.
- डॉ. मोहनराव खाकरे,
ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, अकोला.