विदर्भात ढगाळ वातावरण; गारवाही वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:44 PM2018-12-04T12:44:54+5:302018-12-04T12:45:05+5:30
अकोला: विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही भागात वातावरणात गारवाही वाढला आहे.
अकोला: विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही भागात वातावरणात गारवाही वाढला आहे. सोमवार, ३ डिसेंबर सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १०.५ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले आहे.
मागील चोविस तासात राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. ४ डिसेंबरपर्यंत हे हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ५ डिसेंबर रोजी मध्य महाराष्टÑ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. कोकण व विदर्भात हवामान कोरडे असेल.
दरम्यान, मागील चोविस तासात सोमवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भातील गोंदियाचे किमान तापमान सर्वात कमी १२.० अंश सेल्सीअस होते. त्यानंतर नागपूर येथील किमान तापमान १२.८ होते तर अमरावती १४.३, यवतमाळ १४.४, वर्धा १४.४, चंद्रपूर १५.२,अकोला १५.३ तसेच बुलडाणा येथील किमान तापमान १६.४ अंश होते. मराठवाड्यात औरंगाबाद येथील किमान तापमान १३.०, परभणी १२.९, नांदेड १५.० अंश होते. पुणे १२.८, अहमदनगर १०.५, जळगाव १३.०, कोल्हापूर १७.४, महाबळेश्वर १५.०, मालेगाव १६.४, नाशिक १३.६, सांगली १४.९, सातारा १३.३, सोलापूर १६.६ अंश नोेंदविण्यात आले.