पीक कर्ज वसुलीसाठी सहकारी सोसायट्यांकडून सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:10 PM2020-03-27T18:10:02+5:302020-03-27T18:10:12+5:30

सेवा सहकारी सोसायटींकडून शेतकºयांवर कर्ज वसुलीसाठी सक्ती केल्या जात आहे.

Co-operative societies forced to collect crop loans! | पीक कर्ज वसुलीसाठी सहकारी सोसायट्यांकडून सक्ती!

पीक कर्ज वसुलीसाठी सहकारी सोसायट्यांकडून सक्ती!

googlenewsNext

बोरगाव वैराळे : सेवा सहकारी सोसायटी बोरगाव वैराळेकडून भागभांडवल असणारे शेतकरी नियमित पीक कर्ज वाटप घेऊन दरवर्षी आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असल्याने आपल्याकडे असलेल्या कर्जाची ३१ मार्चपूर्वी परतफेड करतात; मात्र यावर्षी कोरोना व्हायरस पसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री झाली नाही. त्यामुळे कर्जफेड करण्यात अडचणी येणार असल्याने उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जफेड करण्याची मुदत ३० जून जाहीर केली आहे; मात्र तरी सेवा सहकारी सोसायटींकडून शेतकºयांवर कर्ज वसुलीसाठी सक्ती केल्या जात आहे.
बोरगाव वैराळे सेवा सहकारी संस्थेकडृन ३०० शेतकरी सभासद पीक कर्जाची उचल करतात. यापैकी मागील दोन वर्र्षींपासून पीक कर्ज घेऊन परतफेड न करणाºया १८५ शेतकºयांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा मिळाला असून, ११५ शेतकºयांनी आपली पत सेवा सहकारी संस्थेत कायम रहावी म्हणून गतवर्षी कर्जाची परतफेड नियमित केली. त्या नियमित असणाºया शेतकºयांना यावर्षीदेखील आपल्याकडे असलेल्या पीक कर्जाची परतफेड करायची आहे; मात्र यावर्षी देशावर कोरोना व्हायरसचे संकट आल्यामुळे शेतमालाचे भाव तर पडले आहेत तसेच बाजारपेठ बंद पडल्याने पडलेल्या भावातदेखील शेतमालाची विक्री करता येत नसल्याचे चित्र आहे. सेवा सहकारी संस्थेकडून कर्ज वसुलीसाठी सक्ती केल्या जात असल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाकडून दरवर्षी ३१ मार्चपर्यंत कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना शून्य टक्के व्याजदर आकारून मुद्दल रक्कम वसूल करण्याची प्रोत्साहन योजना राबविली जात असते; परंतु यावर्षी महाराष्ट्र शासनाने पीक कर्ज घेणाºया शेतकºयांना ३० जूनपर्यंत व्याजमाफी जाहीर केली आहे,असे असतानादेखील बोरगाव वैराळेसह बाळापूर तालुक्यातील सर्वच सेवा सहकारी संस्था शेतकºयांना ३१ मार्च २०२० पूर्वी कर्जफेड करण्याचा धाक दाखवून कर्जवसुलीसाठी वेठीला धरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी कर्ज भरण्यासाठी गर्दी करीत असल्याने संचारबंदीच्या आदेशाला हरताळ फासल्या जात आहे.

 

Web Title: Co-operative societies forced to collect crop loans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.