गीतांजली एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:35+5:302021-03-10T04:19:35+5:30

हावडाहून मुंबईकडे जाणारी अप ०२२६० क्रमांकाची विशेष गाडी आपल्या नियमित वेळेवर धावत असताना सकाळी ११.१५ वाजताचे दरम्यान काटेपूर्णा व ...

The coach of Gitanjali Express derailed | गीतांजली एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरला

गीतांजली एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरला

Next

हावडाहून मुंबईकडे जाणारी अप ०२२६० क्रमांकाची विशेष गाडी आपल्या नियमित वेळेवर धावत असताना सकाळी ११.१५ वाजताचे दरम्यान काटेपूर्णा व पैलपाड गेट क्रमांक ४७ जवळ असता, या गाडीचा शेवटचा डबा अचानक रुळावरून घसरला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवून वेग नियंत्रित करीत गाडी थांबवली. ताेपर्यंत सुदैवाने डबा उलटला नव्हता. रुळावरून घसरलेला डबा डाऊन लाइनपर्यंत गेल्याने दोन्ही बाजूची रेल्वे वाहतुक थांबविण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके, मुर्तिजापूर विभाग पोलीस उपाधीक्षक संतोष राऊत, आरपीएफ मूर्तीजापुर विभागाचे प्रमुख हरणे,रेल्वे पोलीस यांनी घटनास्थळाला धाव घेतली. रेल्वे प्रशासनाने तातडीने तुटलेला लोहमार्ग दुरुस्त करीत घसरलेला डबा गाडीपासून वेगळा केला. दुरुस्तीचे कार्य सुरु असेपर्यंत दोन्ही बाजूची रेल्वे वाहतुक थांबविण्यात आली होती. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी गाडी पुढील प्रवासाकरीता रवाना करण्यात आली. यावेळी कुरणखेड येथील चंडिका माता अपत्कलीन बचाव पथक, मूर्तिजापूर येथील वंदे मातरम आपत्कालीन बचाव पथक, मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण वाहिका, डॉक्टर हे घटनास्थळी दाखल झाले होतेयावेळी कुरणखेड येथील चंडिका माता अपत्कलीन बचाव पथक, मूर्तिजापूर येथील वंदे मातरम आपत्कालीन बचाव पथक, मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण वाहिका, डॉक्टर हे घटनास्थळी दाखल झाले होते.

प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

वेगाने जात असलेल्या गाडीचा डबा रुळावरून घसरल्यानंतर चालकाने अचानक वेग नियंत्रित केल्यामुळे इतर डब्या्ंमध्ये बसलेल्या प्रवाशांना हादरा बसला. अपघात झल्याचे समजताच प्रवाशांमध्ये खळबड उडाली होती. यावेळी काही प्रवाशांी खिडक्यांमधून बाहेर उड्या मारल्या. बाहेर पडल्यावर गाडीचा शेवटचा डबा घसरला असून, कोणताही मोठा अपघात झाला नसल्याचे समजल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पोलिस व आपत्कालीन बचाव पथक धावले प्रवाशांच्या मदतीला

अपघातग्रस्त डबा वेगळा करून गाडी पुढे रवाना होईपर्यंत दोन तास या ठिकाणी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. बोरगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सुनील सोळंके यांनी प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. कुरणखेड येथील चंडिका माता आपत्कालीन बचाव पथक यांनी घटनास्थळी दाखल होऊन घाबरलेल्या प्रवाशांना धिर देत त्यांना पाणी बॉटल बिस्किट, वाटप केले. आपत्कालीन पथकाचे प्रमुख रंजीत घोगरे, वीरेंद्र देशमुख सदस्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत केली.

डीआरएम यांनी दिले चौकशीचे आदेश

भूसावळ रेल्वे मंडळ प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे तसेच रेल्वे वाहतुक प्रभावित झाली नसल्याचे भूसावळ मंडळ सांगण्यात आले.

अकोल्यात जोडले इंजिन

अपघातस्थळी ब्रेक यान डबा वेगळा केल्यानंतर गाडी अकोला स्थानकावर आणण्यात आली. अकोल्यात २ वाजता ही गाडी आल्यानंतर या ठिकाणी गाडीची तपासणी करण्यात आली. गाडीला गार्ड यान नसल्यामुळे अकोला स्थानकावर असलेले अतिरिक्त इंजिन गार्डयानच्या ठिकाणी जोडण्यात आली व गाडी मुंबईसाठी रवाना करण्यात आली.

Web Title: The coach of Gitanjali Express derailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.