कोकेन प्रकरण; नायजेरियन आरोपीचा गुन्हा मुक्तीचा अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:54 AM2018-04-13T01:54:21+5:302018-04-13T01:54:21+5:30

अकोला : कोकेन जप्त प्रकरणातील आरोपी नायजेरियाचा लुकेचिके एन्जीओवा याचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता गुन्हा मुक्त करण्यासाठी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

Cocaine case; Nigerian accused's plea for forgiveness! | कोकेन प्रकरण; नायजेरियन आरोपीचा गुन्हा मुक्तीचा अर्ज!

कोकेन प्रकरण; नायजेरियन आरोपीचा गुन्हा मुक्तीचा अर्ज!

Next
ठळक मुद्देयालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोकेन जप्त प्रकरणातील आरोपी नायजेरियाचा लुकेचिके एन्जीओवा याचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता गुन्हा मुक्त करण्यासाठी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. 
शहरातील श्रीमंत कुटुंबातील युवकांसाठी आणण्यात येणारे ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी जप्त केले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत १0 लाख रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (वय १९ गुलजारपुरा) याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मुंबईतील लुकेचिके एन्जीओवा याचे नाव समोर आले होते. तीन महिन्यांपूर्वी रामदासपेठ पोलिसांनी लुकेचिके एन्जीओवा मुंबईतून अटक केली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर सिंधी कॅम्प परिसरातील विक्की व रितेश संतानी यांनी कोकेन मागविल्याची माहिती समोर आली होती. आरोपी लुकेचिके एन्जीओवा हा तीन महिन्यांपासून कारागृहात आहे. त्याने न्यायालयात गुन्हा मुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे. गुरुवारी त्याची बाजू अँड. पप्पू मोरवाल, अँड. दुबे यांनी मांडताना पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये लुकेचिके एन्जीओवा याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. केवळ त्याचा जबाब नोंदविला आहे. आरोपीकडून पोलिसांनी कोकेन जप्त केलेले नाही. त्याचा मोबाइल, कॉल रेकॉर्डिंग जप्त केलेले नाही, असा युक्तिवाद करून त्याला गुन्हय़ातून मुक्त करण्याची मागणी केली. 

Web Title: Cocaine case; Nigerian accused's plea for forgiveness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.