जनावरांना बसतोय थंडीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:16 AM2020-12-26T04:16:05+5:302020-12-26T04:16:05+5:30
जनावरांना पायखुरी, तोंडखुरीची लस द्या अकोला: वातावरणातील बदलांचा जनावरांवरही परिणाम होत आहे. या दिवसांत जनावरांमध्ये प्रामुख्याने पायखुरी आणि तोंडखुरीसारख्या ...
जनावरांना पायखुरी, तोंडखुरीची लस द्या
अकोला: वातावरणातील बदलांचा जनावरांवरही परिणाम होत आहे. या दिवसांत जनावरांमध्ये प्रामुख्याने पायखुरी आणि तोंडखुरीसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी जनावरांना पशू दवाखान्यात नेऊन, त्यांना पायखुरी आणि तोंडखुरी रोगाची प्रतिबंधात्मक लस टाेचावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
मास्कचा असुरक्षित वापर ठरू शकतो घातक
अकोला: कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जाते. त्यानुसार बहुतांश लोक मास्कचा वापर करतात; मात्र त्यांच्याकडून मास्कचा वापर चुकीच्या पद्धतीने होताना दिसून येतो. अनेक जण एकच मास्क तीन ते चार दिवस वापरत असल्याने विषाणूच्या फैलावाची शक्यता जास्त आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित मास्कचा वापर करण्याची गरज आहे.
थंडीचा जोर वाढला, लहानग्यांना जपा
अकोला: गत आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून, साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. लहान मुलांमध्येही सर्दी, खोकल्यासारख्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. दवाखान्यामध्येही बालरुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.