थंडीचा कडाका; आजाराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:26+5:302020-12-24T04:18:26+5:30

रस्त्यावर धुरळा; मनपा सुस्त अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू असून, अशाेक वाटिका ते मदनलाल धिंग्रा चाैक ...

Cold snap; Accompanied by illness | थंडीचा कडाका; आजाराची साथ

थंडीचा कडाका; आजाराची साथ

Next

रस्त्यावर धुरळा; मनपा सुस्त

अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू असून, अशाेक वाटिका ते मदनलाल धिंग्रा चाैक ते टाॅवर चाैकापर्यंतच्या मार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मातीचा धुरळा उडत आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या भागात दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात असल्याचे चित्र आहे.

भाजी बाजारात अस्वच्छता

अकाेला : जुने शहरातील शिवाजीनगर परिसरातील भाजी बाजारात व्यावसायिकांकडून सडका भाजीपाला उघड्यावर फेकला जात असल्याचे चित्र आहे.

भाजी बाजारालगत महापालिकेच्या पश्चिम झाेनचे कार्यालय असले तरीही भाजी बाजारातील अस्वच्छतेकडे लक्ष दिल्या जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.

नाले, गटारे तुंबली

अकाेला : मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाई कर्मचाऱ्यांना पडीक प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे तापडिया नगर येथील माेहन भाजी भंडारजवळ नाले, गटारे तुंबल्याचे चित्र आहे.

पथदिवे नादुरुस्त; विद्युत विभाग झाेपेत

अकाेला : शहरात मनपाच्या वतीने एलइडी पथदिवे उभारण्यात आले. परंतु हद्दवाढ क्षेत्रात पथदिव्यांचा अभाव असून, नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अशास्थितीत पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू राहत असल्याचे पहावयास मिळत आहे. याप्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागासह कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे.

साेशल डिस्टन्सिंगला ‘खाे’

अकाेला : शहरात काेराेना विषाणूची लागण झालेल्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली आहे. काेराेनाची लाट पाहता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित असताना बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसत आहे. ताेंडाला मास्क, रुमाल न बांधताच नागरिक घराबाहेर पडत आहेत.

धार्मिकस्थळी गर्दी वाढली

अकाेला : काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दिवाळीपर्यंत धार्मिक स्थळे बंद ठेवली हाेती. त्यानंतर धार्मिक स्थळे उघडण्यात आली. मनपा प्रशासनाच्या आवाहनानंतरही विविध धार्मिक स्थळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असून, यावेळी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे दिसून येत आहे.

शाळेजवळ कचऱ्याचे ढीग

अकाेला : जुने शहरातील भांडपुरा चाैकातील मनपा उर्दू मुलांच्या शाळेसमाेर मुख्य रस्त्यालगत उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरातील नागरिक उघड्यावर कचरा फेकतात. घंटागाडीत कचरा जमा न करता उघड्यावर अस्वच्छता निर्माण करणाऱ्या नागरिकांवर मनपाने कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.

‘अनावश्यक गतिराेधक हटवा’!

अकाेला : शहरातील मुख्य रस्ते तसेच गल्लीबाेळात जागाेजागी गतिराेधक बसविण्यात आले आहेत. नागरिक मनमानीरीत्या घरासमाेर गतिराेधक उभारत आहेत. यामुळे वाहनचालकांना कंबरदुखी, मानदुखी तसेच सांधेदुखीचा त्रास हाेत असून, मनपाने तातडीने अनावश्यक गतिराेधक हटविण्याची मागणी साेमवारी डाबकी राेड भागातील रहिवाशांनी मनपाकडे केली.

अकाेलेकरांची अभय याेजनेकडे पाठ

अकाेला : शहरातील मालमत्ताधारकांकडे थकबाकी असेल तर त्यांना नियमानुसार दाेन टक्के शास्तीचा दंड आकारला जाताे. परंतु मागील तीन वर्षांपासून सत्ताधारी भाजपने शास्ती अभय याेजनेला वारंवार मुदत देण्याचे निर्देश मनपाला दिले. त्यानंतरही या याेजनेकडे अकाेलेकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

Web Title: Cold snap; Accompanied by illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.