थंडीचा कडाका वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:30 AM2020-12-05T04:30:56+5:302020-12-05T04:30:56+5:30
अकाेला: थंडीमुळे लहान मुले व वयाेवृध्द नागरिकांमध्ये सर्दी, खाेकला व तापाचे प्रमाण वाढले असून, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी ...
अकाेला: थंडीमुळे लहान मुले व वयाेवृध्द नागरिकांमध्ये सर्दी, खाेकला व तापाचे प्रमाण वाढले असून, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. अशा स्थितीत काेराेना विषाणूची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने किरकाेळ आजारी पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीती व धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
मुख्य रस्त्यांवर मातीचे ढीग
अकाेला: शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली माती ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकांलगत मातीचे ढीग लावल्या जात आहेत.
जुना भाजी बाजारात अस्वच्छता
अकाेला: जैन मंदिर परिसरातील जुना भाजी बाजारात व्यावसायिकांकडून सडका भाजीपाला उघड्यावर फेकला जात असल्याचे चित्र आहे.
मनपा प्रशासनाकडून सदर व्यावसायिकांना वारंवार अल्टीमेटम दिला जात असूनही व्यावसायिक जुमानत नसल्याने सडक्या भाजीपाल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे.
नाले,गटारे तुंबली
अकाेला: मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाई कर्मचाऱ्यांना पडीक प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे; परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाईकडे पाठ फिरवल्याने नाले, गटारे तुंबल्याचे दिसून येत आहे.
पथदिव्यांचे टायमर बिघडले
अकाेला: शहरात माेठा गाजावाजा करून एलईडी पथदिवे उभारण्यात आले. अद्यापही हद्दवाढ क्षेत्रात पथदिव्यांचा अभाव असून, नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू राहत असल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागासह कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे.
साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकाेला: राज्यात पुन्हा एकदा काेराेना विषाणूची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याचे समाेर आले आहे. काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित असताना रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बस स्थानकासह बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे.
धार्मिकस्थळी भाविकांची गर्दी
अकाेला: काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने दिवाळीपर्यंत धार्मिक स्थळे बंद ठेवली हाेती. त्यानंतर धार्मिक स्थळे उघडण्यात आली. शहरातील विविध धार्मिक स्थळी दर्शनासाठी भाविक गर्दी करीत असून यावेळी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यांवरील गतिराेधक हटवा
अकाेला: शहरातील मुख्य रस्ते असाे व प्रभागांमधील गल्लीबाेळात जागाेजागी गतिराेधक बसविण्यात आले आहेत. नागरिक मनमानीरित्या घरासमाेर गतिराेधक उभारत आहेत. यामुळे वाहनचालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून मनपाने तातडीने अनावश्यक गतिराेधक हटविण्याची मागणी हाेत आहे.
शास्ती अभय याेजनेकडे पाठ
अकाेला: शहरातील मालमत्ता धारकांकडे थकबाकी असेल तर त्यांना नियमानुसार दाेन टक्के शास्तीचा दंड आकारला जाताे. परंतु मागील तीन वर्षांपासून सत्ताधारी भाजपने शास्ती अभय याेजनेला वारंवार मुदत देण्याचे निर्देश मनपाला दिले. त्यानंतरही या याेजनेकडे अकाेलेकरांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.