अकोला जिल्हा गारठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:21 PM2019-12-29T12:21:38+5:302019-12-29T12:21:46+5:30
. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ग्रामीण भागातील किमान तापमान ६.५ अंश नोंदविले आहे.
अकोला : एक महिन्याच्या विलंबानंतर शनिवार २८ डिसेंबर रोजी किमान तापमान घटले असून, अकोला जिल्हा गारठला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाने अकोल्यात किमान ६.५ अंश तापमानाची नोेंद घेतली आहे. दरम्यान,विदर्भात ३० डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. यावर्षी पावसाला लांबला आणि थंडीही उशिरा पडली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी २५,२६ ला विदर्भात पाऊस पडला त्यानंतर थंडी पडण्यास सुरुवात झाली असून, २८ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भातील किमान तापमानात वेगाने घट झाल्याचे हवामान शास्त्र विभागाच्या नोंदीवरू न पुढे आले आहे. अकोल्याचे किमान तापमान १७ अंशावरू न घटून ८.७ वर आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ग्रामीण भागातील किमान तापमान ६.५ अंश नोंदविले आहे. बुलडाणाचे किमान तापमान ९.५ अंश होते. अमरावती ९.२, चंद्रपूर ५.४, गोंदिया ५.२, वर्धा ७.५, यवतमाळ ९.० तर नागपूरचे किमान विदर्भात सर्वात कमी ५.१ अंश नोंद करण्यात आली आहे.