थंडीचा कडाका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 02:27 PM2018-12-22T14:27:12+5:302018-12-22T14:27:19+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. वातावरणातील बदलाने दिवसभर थंडी जाणवत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. गत आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात पारा घसरल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वाढले आहे. बोचरी थंडी वाढल्याने ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. उत्तर भारतात बर्फवृष्ठी झाल्यामुळे आपल्याकडे थंडीचा कडाका वाढला आहे. परिणामी ग्रामीण भागात लहान बालके तसेच वयोवृध्दांना आजार बळावत असल्याचे चित्र आहे. परिसरात विविध विकाणी सायंकाळ नंतर रात्रीच्या वेळी शेकोट्याभोवती नागरिक बसलेले पाहायला मिळत आहे. थंडीबरोबर दिवसा गार वारेही वाहत आहेत. त्यामुळे दिवसभर वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. परिणामी दिवसाही उबदार कपडे वापरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. थंडीमुळे सर्दी, खोकला व पडसे यासारखे आजारही डोके वर काढत आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पहाटेच्या वेळेस थंडीमध्ये व्यायामासाठी जाणाऱ्या तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. तसेच बोचºया थंडीतही उबदार कपडे घालून फिरायला जाणाºयांचाही संख्या वाढत असल्याचे दिसते. नौकरदार वर्ग तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व शाळकरी मुले यांना थंडीतच घराबाहेर पडायला लागत आहे.