‘कृउबास’वर सहकार पॅनलचा झेंडा

By admin | Published: September 22, 2015 01:36 AM2015-09-22T01:36:06+5:302015-09-22T01:36:06+5:30

मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने १८ पैकी ११ जागा केल्या काबीज.

The collaboration panel of 'Crusbus' | ‘कृउबास’वर सहकार पॅनलचा झेंडा

‘कृउबास’वर सहकार पॅनलचा झेंडा

Next

मूर्तिजापूर ( जि. अकोला) : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा झेंडा फडकला. १६ जागांसाठीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. सहकार पॅनलचे ९ संचालक निवडून आले. यापूर्वी सहकार पॅनलचे २ उमेदवार अविरोध निवडून आले. शेतकरी विकास पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनल अशी लढत झाली. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकीकडे माजी जि.प.सदस्य बबन डाबेराव यांच्यासह विनायकराव मुळे, गोविंदराव बरडे यांच्या शेतकरी विकास पॅनलला आमदार हरीश पिंपळे यांनी साथ दिली, तर दुसरीकडे माजी आमदार अँड. भैयासाहेब तिडके यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने आपले उमेदवार रिंगणार उतरविले होते. दरम्यान, सोमवारी सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सेवा सहकारी सर्वसाधारण मतदारसंघातून अमित कावरे यांना ५४५ मते मिळाल्याने ते विजयी झाले. प्रशांत कांबे-५0४ (विजयी), योगेश काटे- २३७ (पराभूत), राजेश कांबे- ४८९ (विजयी), बबन डाबेराव-२५७ (पराभूत), साहेबराव ढाकरे-५१३ (विजयी), सुहासराव तिडके-५४४ (विजयी), गजानन नवघरे-२५३ (पराभूत), अंबादास निंघोट-२५२ (पराभूत), गोविंदराव बरडे-२९१ (पराभूत), शरद बोबडे -४५१ (विजयी), विनायकराव मुळे -२८१ (पराभूत), उत्तमराव लांडे-१३७ (पराभूत), संजय साबळे-२७९ (पराभूत) आणि मधुकर हेरोळे हे ४३६ मते मिळवित विजयी झाले. सेवा सहकारी महिला राखीव मतदारसंघातून सरला खोत-२९२ (पराभूत), अर्चना खंडारे-३१८ (पराभूत), शोभा तिडके-५४९(विजयी) आणि चित्रा सरोदे या ५३८ मिळवित विजयी झाल्या. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून रामचंद्र खंडारे-३0५ (विजयी), दिवाकर गावंडे-२४७ (पराभूत), वैशाली पाचडे-२१६ (पराभूत) आणि संजय वानखडे हे २९३ मते मिळवित विजयी झाले. ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदारसंघातून मनोरमा बाजड-२३३ (पराभूत) आणि सुनील सरोदे यांनी ३३0 मते मिळवित बाजी मारली.

Web Title: The collaboration panel of 'Crusbus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.