धर्मदाय संस्थांच्या वतीने अकोल्यात ६ मे रोजी सामूहिक विवाहाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:20 PM2018-03-29T14:20:53+5:302018-03-29T14:20:53+5:30
अकोला : धर्मदाय संस्था सामूहिक विवाह आयोजन समिती च्या वतीने येत्या ६ मे रोजी अकोल्यात सर्व जातीसमूहाचे आदर्श विवाह आयोजित करण्यात आले आहे.
अकोला : धर्मदाय संस्था सामूहिक विवाह आयोजन समिती च्या वतीने येत्या ६ मे रोजी अकोल्यात सर्व जातीसमूहाचे आदर्श विवाह आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात धर्मदाय उपआयुक्त के. व्ही. मसने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष धनंजय मिश्रा यांनी दिली . छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या पुण्यतीथी दिनी ६ मे ला होणाऱ्या या सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. समाजातील विविध संस्था,संघटना, दानशूर व्यक्ति यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी धर्मदाय उपायुक्त के. व्ही. मसने यांनी केले. या बैठकीला कार्याध्यक्ष विजय जानी, विजय सिह गहिलोत,ज्ञानेश्वर ढेरे, सचिव डॉ. कृष्ण मुरारी शर्मा, कोषाध्यक्ष प्रशांत पाटील, प्रशांत लोहिया,संजीव घड्याळ, विजय ढोरे, संतोष मानकर, अविनाश नाकट, डॉ. निलेश पाटील, कविता शिरशाठ, अधीक्षक ताकवाले, नोंदणी अधिकारी किशोर तलोकर, मानकर यांच्यासह सर्व तालुका निरीक्षक, संस्था सदस्य उपस्थित होते.