जिल्हाधिकाऱ्यांनी केली साफसफाई; जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा प्रारंभ

By संतोष येलकर | Published: August 1, 2023 07:46 PM2023-08-01T19:46:38+5:302023-08-01T19:46:38+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा मंगळवारी प्रारंभ करण्यात आला.

collector did the cleaning Commencement of Revenue Week in the district through labor donation at the Collector's office | जिल्हाधिकाऱ्यांनी केली साफसफाई; जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा प्रारंभ

जिल्हाधिकाऱ्यांनी केली साफसफाई; जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा प्रारंभ

googlenewsNext

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये स्वत: जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हातात फावडे घेवून कार्यालय परिसरातील गवत काढले आणि खराट्याने परिसर झाडूनही काढला.

महसूल दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित श्रमदान कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होवून कार्यालय परिसरात स्वचछताकार्य केले. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सहभाग घेत श्रमदान केले. हातात घेतलेल्या फावड्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गवत काढले तसेच खराटा घेवून कार्यालयाचा परिसर झाडून काढला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील श्रमदानात अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवान, जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काळे यांच्यासह महसूल विभागाचे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत श्रमकार्य केले. सफाईकार्यात गोळा केलेले गवत आणि कचरा महापालिकेच्या वाहनाद्वारे वाहून नेण्यात आला.

महसूल सप्ताहात असे कार्यक्रम राबविणार
जिल्हयात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ई- हक्क पोर्टलबाबतची कार्यवाही, महसूल नोंदी दुरुस्ती, गाव तिथे स्मशानभूमी सुविधा निर्माण करण्यासाठी मोहिम, दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, सैनिकांना प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात येतील. सलोखा योजनेत गावागावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी शिबीरे घेण्यात येणार आहेत.

नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करुन द्या - जिल्हाधिकारी
कोणतेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी सांघिक समन्वय आवश्यक असतो. महसूल सप्ताहात अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप आदी विविध कामे करण्यात येतील. यासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक काम समन्वयाने पूर्ण करून, सप्ताहातील उपक्रमांबाबत जनजागृती करीत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी व त्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या.

Web Title: collector did the cleaning Commencement of Revenue Week in the district through labor donation at the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला