पीक विम्याची रक्कम न घेतल्यास बँकांविरुद्ध गुन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 03:05 AM2017-07-29T03:05:46+5:302017-07-29T03:05:49+5:30

पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ करणा-या बँकांच्या संबंधित अधिका-यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिले.

collector directs revenue officers to file cases against banks not accepting crop loan payments | पीक विम्याची रक्कम न घेतल्यास बँकांविरुद्ध गुन्हे!

पीक विम्याची रक्कम न घेतल्यास बँकांविरुद्ध गुन्हे!

Next
ठळक मुद्देजिल्हाधिका-यांचे एसडीओ-तहसीलदारांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शेतक-यांनी भरावयाची पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ करणाºया बँकांच्या संबंधित अधिका-यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिले.
उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या तालुक्यातील बँकांना भेटी देण्याच्या सूचना देत, पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्याबाबत शेतकºयांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास,संबंधित बँक अधिकाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे हे निर्देश आहेत.

बँक व्यवस्थापकाची कानउघाडणी!
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी उगवा येथील विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेत थकबाकीदार शेतकºयांकडून पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यात येत नसल्याची तक्रार उगवा येथील विलास गणपतराव देशमुख व इतर शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली.याची दखल घेत, जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांच्यासह तहसीलदार राजेश्वर हांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी शुक्रवारी उगवा येथील बँकेला भेट देऊन, बँकेच्या अभिलेख्याची तपासणी केली. त्यामध्ये शेतकºयांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी बँक व्यवस्थापकांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच बार्शीटाकळी येथील स्टेट बँक आॅफ इडियाच्या शाखेलाही जिल्हाधिकाºयांनी भेट दिली.

‘हेल्पलाइन’वर संपर्क साधा!
विमा हप्त्याची रक्कम बँक अधिकाºयांकडून स्वीकारण्यात येत नसेल किंवा टाळाटाळ करण्यात येत असेल तर संबंधित शेतकºयांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘हेल्पलाइन नंबर-१०७७’ वर किंवा संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील शेतकºयांना केले आहे.

रविवारीही बँका सुरू!
पंतप्रधान पीक विजमा योनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी सोमवार, ३१ जुलैपर्यंत मुदत आहे.पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यासाठी रविवार, ३० जुलै रोजी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा सुरू राहणार आहेत.

Web Title: collector directs revenue officers to file cases against banks not accepting crop loan payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.