जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली खदानींची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:47 PM2018-10-31T12:47:00+5:302018-10-31T12:47:18+5:30

अकोला : जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील येवता व बोरगाव मंजू येथील १६ खदानींची तपासणी ...

 Collector, Superintendent of Police inspected the mines | जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली खदानींची तपासणी!

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली खदानींची तपासणी!

Next

अकोला : जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील येवता व बोरगाव मंजू येथील १६ खदानींची तपासणी करून, खदानींच्या गौण खनिज उत्खननाचा ‘लेखाजोखा’ घेतला.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, अकोल्याचे उपविभागीय डॉ. नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, बार्शीटाकळीचे राजेश काळे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांनी येवता येथील सहा खदानी आणि बोरगाव मंजू येथील १० खदानींची प्रत्यक्ष पाहणी करून, खदानींमधील गौण खनिजाच्या उत्खननाची तपासणी केली. भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या खदानीपोटी खनिपट्टाधारकांनी स्वामित्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) केलेला भरणा आणि त्या तुलनेत खदानींमधून गौण खनिजाचे करण्यात आलेले उत्खनन यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी माहिती घेतली. या तपासणीत आढळून आलेल्या बाबीसंदर्भात करावयाच्या कारवाईसंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना निर्देशही दिले.

अवैध उत्खनन; आज कारवाईचा आदेश?
जिल्हाधिकाºयांसह संबंधित अधिकाºयांनी केलेल्या ११ खदानींच्या तपासणीत खदानींमध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आल्याचे कळते. खदानींच्या तपासणीत आढळून आलेल्या बाबींसंदर्भात करावयाच्या कारवाई संदर्भात जिल्हाधिकाºयांकडून बुधवारी आदेश काढण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

अवैध उत्खनन करताना जप्त केल्या होत्या दोन ‘पोकलेन’ मशीन!
येवता येथील ई-क्लास जमिनीवरील खदानींची तपासणी जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड व तहसीलदार विजय लोखंडे यांनी गत १७ सप्टेंबर रोजी केली होती. या तपासणीत खदानींमध्ये अवैध उत्खनन करताना आढळून आल्याने दोन ‘पोकलेन’ मशीन जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाºयांनी येवता येथील या खदानींची तपासणी करून उत्खननाचा लेखाजोखा घेतला आहे.
 

 

Web Title:  Collector, Superintendent of Police inspected the mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.