जिल्हाधिकारी सायकलवर; चांदुरात वाटणार सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:29 AM2017-08-01T02:29:39+5:302017-08-01T02:30:20+5:30

अकोला : जिल्ह्यात शेतकºयांना सात-बारा सहज व सुलभरीत्या मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले आहे.

On the collector's bike; Chandrabar will be seen in seven bara | जिल्हाधिकारी सायकलवर; चांदुरात वाटणार सातबारा

जिल्हाधिकारी सायकलवर; चांदुरात वाटणार सातबारा

Next
ठळक मुद्देआज सर्व शासकीय अधिकारी कार्यालयात सायकलने येणार!शेतक-याच्या वेशात संगणकीकृत सात-बारा वितरित करणारअधिकारी व कर्मचारी कार्यालयात सायकलवर येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात शेतकºयांना सात-बारा सहज व सुलभरीत्या मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले आहे. मंगळवार, १ आॅगस्टला महसूल दिनानिमित्त स्वत: जिल्हाधिकारी शेतकºयाच्या वेशात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने जाऊन शेतकºयांना संगणकीकृत सात-बारा वितरित करणार आहेत.
सात-बारा हा शेतकºयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सात-बाराचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. अकोला जिल्ह्यात हे काम पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.
मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात जाणार आहेत. त्यानंतर गावात बैलगाडीने फिरणार आहेत. यावेळी ते संगणकीकृत सात-बाराचे शेतकºयांना वितरण करणार आहेत. या माध्यमातून शेतकºयांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हा देखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Web Title: On the collector's bike; Chandrabar will be seen in seven bara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.