मालवाहू व प्रवासी वाहनाची अमोरासमोर धडक; तीन ठार, पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:11+5:302021-01-17T04:17:11+5:30

पातूर : अकोला-पातूर मार्गावरील चिखलगावनजीक मालवाहू व प्रवासी वाहनाची अमोरासमोर धडक होऊन तीन जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ...

Collision of cargo and passenger vehicle in front of Amora; Three killed, five seriously injured | मालवाहू व प्रवासी वाहनाची अमोरासमोर धडक; तीन ठार, पाच गंभीर

मालवाहू व प्रवासी वाहनाची अमोरासमोर धडक; तीन ठार, पाच गंभीर

Next

पातूर : अकोला-पातूर मार्गावरील चिखलगावनजीक मालवाहू व प्रवासी वाहनाची अमोरासमोर धडक होऊन तीन जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, सर्व मृतक वाशिम जिल्ह्यातील आहेत. चालक संजय निवृत्ती राऊत (४५) (रा.मुंगळा, ता. मालेगाव जि. वाशिम), लक्ष्मी रामभाऊ वंजारे (६५), बाळू बळीराम कुऱ्हे (३५) (दोन्ही राहणार कळंबेश्वर ता.मालेगाव, जि.वाशिम) अशी मृतांची नावे आहेत.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगळा, कळंबेश्वर येथून दोन कुटुंबे अकोल्याकडे प्रवासी वाहन क्रमांक (एमएच ३७ व्ही ५३८१) ने निघाले होते. पातूर-अकोला मार्गाने येत असताना, चिखलगावनजीक अकोल्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू क्रमांक (एमएच ३० एल २९९६)ची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भिषण होता की, वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात तीन जण ठार झाले असून, प्रवासी वाहनातील ज्ञानेश्वर रामभाऊ वंजारे (२७), रामभाऊ गोविंदा वंजारे (५८), दगडाबाई बळीराम कुर्हे (६५), गायत्री ज्ञानेश्वर वंजारे (२), भागवत बळीराम कुर्हे (३२) (सर्व रा. कळंबेश्वर ता.मालेगाव जि.वाशिम) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवासी वाहनाचे मालक श्यामराव नामदेव चतरकार हे मुंगळा येथून स्वतः गाडी चालवित होते. त्यांना शिर्ला येथील मित्राला भेटायचे असल्याने, त्यांनी मृत चालक संजय निवृत्ती राऊत यांच्या ताब्यात वाहन दिले. अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतराने प्रवासी वाहनाचा गंभीर अपघात झाला. त्यामुळे श्यामराव नामदेव चतरकार हे सुदैवाने बचावले. घटनेची माहिती मिळताच, चिखलगाव येथील तपे हनुमान मंडळाचे गोपाल काकड, अतुल सपकाळ, सागर चांदुरकर, महादेव कुवारे, विकी शेगोकार, अभिषेक ढगे, विकी तायडे, सुनील ढगे, मंगेश चांदुरकर, प्रतीक बळवंतकार, सुरेश ठाकरे, साबीर शेख, दुले खान युसूफ खान यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने दवाखान्यात पाठविले. घटनास्थळी पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी मार्गदर्शनात पीएसआय अमोल गोरे, पोलीस नाईक, पंजाबराव चराटे, हेड कॉन्स्टेबल अर्जुन दुतोंडे, जगदीश शिंदे दाखल होऊन पंचनामा केला. श्यामराव नामदेव चतरकार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मालवाहू चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ अ मोटर वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. (फोटो)

Web Title: Collision of cargo and passenger vehicle in front of Amora; Three killed, five seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.