अकोला शहरात काेविड व्हॅक्सिनसाठी रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:15 AM2021-01-09T04:15:10+5:302021-01-09T04:15:10+5:30

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत मनपा प्रशासनाने काेविड व्हॅक्सिनच्या रंगीत तालीमसाठी पूर्वतयारी केली हाेती. शुक्रवारी अशाेकनगर ...

Color training for cavid vaccine in Akola city | अकोला शहरात काेविड व्हॅक्सिनसाठी रंगीत तालीम

अकोला शहरात काेविड व्हॅक्सिनसाठी रंगीत तालीम

Next

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत मनपा प्रशासनाने काेविड व्हॅक्सिनच्या रंगीत तालीमसाठी पूर्वतयारी केली हाेती. शुक्रवारी अशाेकनगर आयुर्वेदिक दवाखाना अकोट फैल, येथे लस देण्‍याबाबतची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्‍यात आली. यावेळी महापौर अर्चना मसने यांच्‍या हस्‍ते लसीकरण कक्षाची फीत कापण्यात आली. याप्रसंगी आमदार गावर्धन शर्मा, माजी महापौर विजय अग्रवाल, माजी नगरसेवक जयंत मसने तसेच मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. फारूख शेख, केंद्रप्रमुख डॉ.अनुप चौधरी, डॉ. मनीषा बोरेकर, डॉ.अजमल खान, डॉ. वासिक अली, डॉ.सुचित्रा मोहिते, डॉ.मस्‍लेउद्दीन शेख, आरोग्‍य निरीक्षक अब्‍दुल सलीम आदींची उपस्थिती होती. कमलकिशोर भगत, योगेश माल्‍टे, प्रदीप चौहान, यांनी लसीकरणाबाबत प्रात्‍यक्षिक करून दाखविले.

२५ कर्मचाऱ्यांची निवड

ड्राय रन माेहिमेंतर्गत एक दिवसआधी वैद्यकीय यंत्रणेतील २५ आरोग्‍य कर्मचाऱ्यांची निवड करण्‍यात आली. तसेच त्‍यांना मोबाईल ॲपद्वारे संदेश पाठवण्‍यात आले होते. शुक्रवारी सकाळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे निवड केलेल्या कर्मचाऱ्यांची ॲपमध्‍ये नोंद करण्‍यात आली. अशोकनगरस्थित आयुर्वेदिक दवाखान्‍यामध्‍ये रंगीत तालमीसाठी लसीकरण प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि लसीकरण निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार करण्‍यात आले आहेत. सदर कक्षामध्‍ये जनजागृतीबाबतचे पोस्‍टर, बॅनर लावण्‍यात आले होते.

Web Title: Color training for cavid vaccine in Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.