जिल्ह्यात ४२ अधिकाऱ्यांसह २३८ पोलिसांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन

By सचिन राऊत | Published: March 3, 2024 08:09 PM2024-03-03T20:09:35+5:302024-03-03T20:09:35+5:30

५८७ वाहनांची तपासणी करीत ९५ वाहन चालकांवर कारवाई.

Combing operation conducted by 238 policemen along with 42 officers in the district | जिल्ह्यात ४२ अधिकाऱ्यांसह २३८ पोलिसांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन

जिल्ह्यात ४२ अधिकाऱ्यांसह २३८ पोलिसांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन

अकोला : जिल्हयात वाढत्या मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात जिल्हयात ३ मार्चच्या रात्री अचानक नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ४२ पाेलिस अधिकाऱ्यांसह २३८ पाेलिस अंमलदारांनी सहभागी हाेत रात्रभर कारवाइचा सपाटा लावला. या दरम्यान ५८७ वाहणांची तपासणी करीत ९५ वाहन चालकांवर दंडात्मक कारवइ करण्यात आली.

जिल्हयात वाढलेल्या चाेरीच्या घटना राेखण्यासाठी पाेलिसांनी कंबर कसली असून पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेत अपर पोलीस अधीक्षक अभय डाेंगरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी यांनी काेम्बींग ऑपरेशनमध्ये सहभाग घेवुन कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान रिफलेक्टर जॅकेट व टॉर्च घेवुन नाकाबंदीत बॅरीकेटींग करून तपासलेले प्रत्येक वाहनाचा क्रंमाक व चालकाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रंमाक घेवुन दुचाकी ३०६ व चारचाकी २८१ अशा प्रकारे एकुण ५८७ वाहने चेक करून त्यापैकी ९५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ६५ निगराणी बदमाश व ४२ माहितीगार गुन्हेगार चेक करण्यात आले. कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा याप्रमाणे ९ कारवाई, कलम १४२ प्रमाणे ०१ कारवाई, भारतीय हत्यार कायदयान्वये ०१ कारवाई करण्यात आली. कलम ३३ आर डब्लयु प्रमाणे ०२ कारवाइ, कलम ११०,११७ प्रमाणे एकुण २६ कारवाया करण्यात आल्या. ०
 
जिल्हयातील ६६ हाॉटेलची तपासणी

कोम्बींग ऑपरेशन दरम्यान जिल्हयातील ६६ हॉटेल लॉजेस व ९५ एटीएमची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी, अंमलदार यांनी सहभाग घेवुन कारवाइ केली. यासोबतच एका तडीपार इसमास अटक केली असून सतत अशा प्रकारचे कोम्बींग ऑपरेशन व नाकाबंदी जिल्हयात सुरुच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

Web Title: Combing operation conducted by 238 policemen along with 42 officers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला