आओ जाओ घर तुम्हारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:57+5:302021-03-18T04:17:57+5:30
--बॉक्स-- बसस्थानक शहरातील बसस्थानकावर मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक तसेच मध्य प्रदेश येथून प्रवाशी येतात. या प्रवाशांची कोणतीच ...
--बॉक्स--
बसस्थानक
शहरातील बसस्थानकावर मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक तसेच मध्य प्रदेश येथून प्रवाशी येतात. या प्रवाशांची कोणतीच तपासणी केली जात नाही. त्यांना क्वारंटाईन केले जात नाही. सोबतच त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, पत्ता सुद्धा घेतला जात नसल्याचे समोर आले. केवळ सूचना फलकावर माहिती देण्यात आली आहे.
--बॉक्स--
रेल्वेस्थानक
रेल्वेस्थानकावर परजिल्ह्यातून व परराज्यातून प्रवाशी येतात. या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची कुठलीच तपासणीची सोय नाही. बिनधास्तपणे परजिल्ह्यातून प्रवाशी येत-जात असून त्यांना क्वारंटाईन केले जात नाही. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, पत्ताही घेण्याची कुणाला तसदी नसून थर्मलस्कॅनिंगचा पत्ता नसल्याचे निदर्शनास आले.
--बॉक्स--
जिल्हासीमा
जिल्ह्याच्या सीमा खुल्या केल्यानंतर विना रोकटोक वाहने ये-जा करत आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत नाही. त्यांना क्वारंटाईन केले जात नसून त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, पत्ताही घेतला जात नाही. त्यांनी मास्क घातले किंवा नाही हेही बघण्यात येत नाही.
--बॉक्स--
वाढत्या संसर्गात उपाययोजना शून्य
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्व व्यवसायास परवानगी दिली. इतरवेळेस संचारबंदी आहे; मात्र बसस्थानक, रेल्वेस्थानक व जिल्हासीमा येथे उपाययोजना संदर्भात केवळ निर्देश देण्यात आले आहे. परंतु अंमलबजावणी शून्य आहे. सॅनिटायझेशनही होत नाही.