गोरेगाव येथे सूक्ष्म नियोजन आराखड्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:46+5:302021-03-13T04:34:46+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी लोकांमध्ये ग्रामस्थांना विकासाची संकल्पना व पोकरा प्रकल्पाच्या विकासाच्या आराखड्याबाबत ग्रामपंचायत गोरेगाव येथे ऋतुचक्र पीक पद्धती ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी लोकांमध्ये ग्रामस्थांना विकासाची संकल्पना व पोकरा प्रकल्पाच्या विकासाच्या आराखड्याबाबत ग्रामपंचायत गोरेगाव येथे ऋतुचक्र पीक पद्धती विषयांवर चर्चा करण्यात आली. कृषी सहायक शुभांगी कथलकर (गिर्हे) यांनी ग्रामस्थांना सूक्ष्म नियोजनाचा तांत्रिक बाबी व कृती आराखड्याची पपत्रे समजावून सांगून जल व मृदा जलसंधाराणचे महत्व सांगितले. गावातील शेततळे, नाला खोलीकरण आणि पाणलोटाच्या प्रस्तावित करायच्या कामांचे विश्लेषण केले, मंडळ कृषी अधिकारी विलास चव्हाण यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून पोकरा प्रकल्पाच्या योजनांची माहिती दिली. सूक्ष्म नियोजन प्रक्रियेसाठी सरपंच यशोदा देवानंद सरदार व कृषी सहायक प्रतीक अवगन, काळे, तात्याराव गडदे, श्रीराम रासकर, समूह सहायक कुलदीप थोरात, प्रतीक बढे व गावातील ग्रामस्थ विजय डोईफोडे, फायजोद्दीन शेख, राजू पिसाट, देवानंद सरदार, जगन सरदार श्रीकांत डोईफोडे यांनी परिश्रम घेतले. (फोटो)